१६ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ फेब्रुवारी २०१८
१६ फेब्रुवारी दिनविशेष | February 16 in History
दादासाहेब फाळके, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

दादासाहेब फाळके - (३० एप्रिल १८७० - १६ फेब्रुवारी १९४४) धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपट निर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १७४२: स्पेन्सर कॉम्प्टन इंग्लंडच्या पंतप्रधानपदी.
 • १८३८: दक्षिण आफ्रिकेत झुलु सैन्याने ब्लौक्रान्स नदीच्या काठी शेकडो फूरट्रेकरना मारले.
 • १८६२: अमेरिकन यादवी युद्ध - जनरल युलिसिस एस. ग्रँटने फोर्ट डोनेलसनचा किल्ला काबीज केला.
 • १९१८: लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
 • १९२३: प्राचीन इजिप्तचा राजा तुतेनखामेनची कबर उघडण्यात आली.
 • १९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने बटान परत मिळवले.
 • १९५९: फिदेल कास्त्रो क्युबाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९८३: ऑस्ट्रेलियातील वणव्यात ७१ मृत्युमुखी.
 • १९९८: चायना एरलाइन्स फ्लाइट ६७६ हे एरबस ए३०० जातीचे विमान तैवानच्या च्यांग-काइ-शेक विमानतळाजवळ कोसळले. जमिनीवरील ६ व्यक्तिंसह २०२ ठार.

जन्म/वाढदिवस


 • १०३२: यिंगझॉँग, चीनी सम्राट.
 • १२२२: निचिरेन, जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचा स्थापक.
 • १७४५:थोरले माधवराव पेशवे.
 • १८२२: सर फ्रान्सिस गाल्टन,बोटांच्या ठशांचे वेगळेपण सिध्द करणारे.
 • १८७६: रँगलर परांजपे, हे केंब्रिज विद्यापीठाचा रॅग्लर हा वरिष्ठ किताब पटकावणारे पहिले भारतीय होते.
 • १९४१: किम जोँग-इल, उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५४: मायकेल होल्डिंग, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १२७९: तिसरा आफोन्सो, पोर्तुगालचा राजा.
 • १३९१: जॉन पाचवा पॅलिओलोगस, बायझेन्टाईन सम्राट.
 • १८९९: फेलिक्स फॉउ, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९४४: दादासाहेब फाळके, महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते.
 • १९५५: मेघनाथ साहा, सुप्रसिध्द शास्त्रज्ञ.