MarathiMati.com - Android App on Google Play Store

१४ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ फेब्रुवारी २०१३

१४ फेब्रुवारी दिनविशेष(February 14 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • व्हॅलेन्टाईन्स डे

ठळक घटना, घडामोडी


  • ८४२ - टकल्या चार्ल्स व जर्मन लुइसने तह केला.
  • १०१४ - पोप बॉनिफेस पहिल्याने बव्हारियाच्या हेन्रीला जर्मनीचा राजा म्हणून मान्यता दिली.
  • १०७६ - पोप ग्रेगोरी सातव्याने पवित्र रोमन सम्राट हेन्री चौथ्याला वाळीत टाकले.
  • १८०३ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायाधीश जॉन मार्शलने जाहीर केले की अमेरिकन संविधानाच्या विरुद्ध असलेला कुठलाही कायदा लागू करता येणार नाही.
  • १८०४ - सर्बियात ऑट्टोमन साम्राज्याविरूद्ध उठाव.
  • १८५९ - ओरेगोन अमेरिकेचे ३३वे राज्य झाले.
  • १८७६ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रेने एकाच दिवशी दूरभाष यंत्रणेच्या पेटंटसाठी अर्ज केला.
  • १८७९ - चिलीने बॉलिव्हियाच्या अँटोफागस्टा शहरावर हल्ला केला. दोन्ही देशात युद्ध सुरू.
  • १८९९ - अमेरिकेत निवडणुक यंत्र वापरण्यास सुरूवात.
  • १९०० - दक्षिण आफ्रिकेत दुसरे बोअर युद्ध सुरू.
  • १९१२ - अ‍ॅरिझोना अमेरिकेचे ४८वे राज्य झाले.
  • १९१२ - ग्रोटोन, कनेक्टिकट येथे पहिली डीझेल पाणबुडी तयार झाली.
  • १९१८ - एडगर राइस बरोच्या टारझनवरील पहिला सिनेमा प्रदर्शित झाला.
  • १९१९ - रशिया व पोलंडमध्ये युद्ध सुरू.
  • १९२४ - संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एमची स्थापना.
  • १९२९ - शिकागोत माफिया ऍल कपोनच्या गुंडांनी विरुद्ध टोळीतील सात गुंडांना गोळ्या घातल्या.
  • १९४३ - दुसरे महायुद्ध - रोस्तोव, रशियाला रशियन सैन्याने जर्मन वेढ्यातुन मुक्त केले.
  • १९४३ - दुसरे महायुद्ध - कॅसेरिन पासची लढाई - ट्युनिसीयात फील्ड मार्शल एर्विन रोमेलच्या आफ्रिका कोरने कॅसेरिन घाटातील दोस्त राष्ट्रांच्या सैन्यावर कडाडून हल्ला चढवला.
  • १९४४ - दुसरे महायुद्ध - जावात जपानी सैन्याविरुद्ध उठाव.
  • १९४५ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने जर्मनीच्या ड्रेस्डेन शहरावर तुफानी बॉम्बफेक केली व शहर बेचिराख केले.
  • १९४५ - चिली, इक्वेडोर, पेराग्वे व पेरू संयुक्त राष्ट्रात दाखल.
  • १९४५ - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट व सौदी अरेबियाचा राजा इब्न सौद यांच्यात बैठक. अमेरिका व सौदी अरेबियात राजकीय संबंध सुरू.
  • १९४६ - बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण.
  • १९४६ - पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.
  • १९४९ - इस्रायेलच्या संसदेची (क्नेसेट) पहिली बैठक सुरू.
  • १९५२ - नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे सहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
  • १९६१ - १०३ क्रमांकाचा मूलभूत पदार्थ, लॉरेन्सियमची प्रथमतः निर्मिती.
  • १९६६ - ऑस्ट्रेलियन डॉलरचे दशमान पद्धतीत रूपांतर.
  • १९८० - अमेरिकेत लेक प्लॅसिड येथे तेरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
  • १९८१ - आयर्लंडची राजधानी डब्लिन येथील नाइट क्लबला लागलेल्या आगीत ४८ ठार.
  • १९८९ - भोपाळ दुर्घटना - युनियन कार्बाइडने भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले.
  • १९८९ - ईराणच्या रुहोल्ला खोमेनीने ब्रिटीश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.

जन्म, वाढदिवस


  • १४८३ - बाबर, मोगल सम्राट.
  • १९१३ - जिमी हॉफा, अमेरिकन कामगार नेता.
  • १९३३ - मधुबाला, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
  • १९४२ - मायकेल ब्लूमबर्ग, न्यूयॉर्कचा महापौर.
  • १९४६ - बर्नार्ड डोवियोगो, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४७ - सलाहुद्दीन, क्रिकेट खेळाडू, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९६८ - क्रिस लुईस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ - एच.डी. ऍकरमन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १४०० - रिचर्ड दुसरा, इंग्लंडचा राजा.
  • १४०५ - तैमुर लंग, मोंगोल राजा.
  • १५२३ - पोप एड्रियान सहावा.
  • १८३१ - व्हिसेंते ग्वेरेरो, मेक्सिकोचा स्वातंत्र्यसैनिक.
  • १८९१ - विल्यम टेकुमेश शेर्मन, अमेरिकन सेनापती.
  • १९७५ - पी.जी.वुडहाउस, ब्रिटीश लेखक.
  • १९८९ - जेम्स बॉन्ड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ.
  • १९९५ - उ नु, म्यानमारचा राजकारणी.
  • २००५ - रफिक हरिरि, लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष.
MarathiMati.com - Android App on Google Play Store