१ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २०१८
संभाजी भोसल
कल्पना चावला, छायाचित्र: नासा

कल्‍पना चावला - (१ जुलै १९६१ - १ फेब्रुवारी २००३) ह्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर होत्या. कल्‍पना चावला ह्या भारतीय वंशाच्या अंतराळात जाणाऱ्या प्रथम महिला अंतराळवीर होत्या.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १६६२: ९ महिने वेढा घातल्यावर चीनच्या सेनापती कॉक्सिंगाने तैवान जिंकले.
 • १६८९: संगमेश्वरावर संभाजीराजेना कैद करण्यात आले
 • १७९०: न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सत्र सुरू झाले.
 • १७९३: फ्रांसने नेदरलँड्स व युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले.
 • १८१४: फिलिपाईन्सच्या मेयोन ज्वालामुखीचा उद्रेक १,२०० ठार.
 • १८३१: ललित कला प्रदर्शन कलकत्ता येथे संपन्न झाले.
 • १८६१: अमेरिकन यादवी युद्ध - टेक्सास अमेरिकेपासून विभक्त झाले.
 • १८८४: ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित. तेव्हापासून ऑक्सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे.
 • १९०८: पोर्तुगालचा राजा कार्लोस पहिला व राजकुमार लुइस फिलिपेची हत्या.
 • १९२०: कॅनडात रॉयल केनेडियन माउंटेड पोलिस तथा माउंटीज् या पोलिस संघटनेची स्थापना.
 • १९४३: दुसरे महायुद्ध - नाझी सैन्याने व्हिडकुन क्विस्लिंगला नॉर्वेच्या पंतप्रधानपदी बसवले.
 • १९४६: नॉर्वेच्या त्रिग्वे लीची संयुक्त राष्ट्रांच्या प्रथम सरचिटणीस पदी निवड.
 • १९५९:`रोहिणी' मासिकाने `शुभमंगल मेळा' घेण्यास सुरुवात केली.
 • १९७४: साओ पाउलो, ब्राझिलमध्ये कार्यालये असलेल्या ईमारतीला आग. १८९ ठार, २९३ जखमी.
 • १९७७:भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली.
 • १९७९: रुहोल्ला खोमेनी १५ वर्षांनी परत ईराणमध्ये आला.
 • १९८१: ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडमधील क्रिकेट एक दिवसीय सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यू झीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाउ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म फेकी करण्यास सांगितले. ट्रेव्हरने तसे केले, ऑस्ट्रेलिया सामना जिंकले परंतु यानंतर अंडरआर्म फेकी बेकायदा ठरवण्यात आली.
 • १९९१: लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर यु.एस. एरचे विमान दुसर्‍या छोट्या विमानाला धडकले. ३५ ठार.
 • १९९२: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले.
 • २००२: आयर्लंडमधील शांतता प्रक्रियेला चालना देणार्‍या 'गुड फ्रायडे' कराराचे शिल्पकार जॉन ह्यूम यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा गांधी शांतता पुरस्कार प्रदान.
 • २००३: अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी.
 • २००४: मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार.

जन्म/वाढदिवस


 • १८६४: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, जगप्रसिध्द निग्रो कृषितज्ज्ञ.
 • १८८१: टिप स्नूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १८८२: लुई स्टीवन सेंट लॉरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान.
 • १८८४: सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार.
 • १९०१: क्लार्क गेबल, अमेरिकन अभिनेता.
 • १९०४: बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी.
 • १९१०: जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९२२: क्लिफर्ड मॅकवॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
 • १९३०: शहाबुद्दीन अहमद, बांगलादेशी राष्ट्राध्यक्ष.
 • १९३१: बोरिस येल्त्सिन, रशियन राष्ट्राध्यक्ष.
 • १९३१: इयाजुद्दीन अहमद, बांगलादेशी राष्ट्राध्यक्ष.
 • १९४२: डेव्हिड सिनकॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९५०: नसीर मलिक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९५८: जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता.
 • १९६५: डेव्ह कॅलाहन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६९: महबुबुर रहमान, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
 • १९७१: अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९७२: कर्टली ऍम्ब्रोझ, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
 • १९८१: ग्रेम स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९८२: शोएब मलिक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १३२८: चार्ल्स चौथा, फ्रांसचा राजा.
 • १५६३: मेनास, इथियोपियाचा सम्राट.
 • १६९१: पोप अलेक्झांडर आठवा.
 • १७३३: ऑगस्टस दुसरा, पोलंडचा राजा.
 • १९०८: कार्लोस पहिला, पोर्तुगालचा राजा.
 • १९८१: डोनाल्ड विल्स डग्लस, सिनियर, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.
 • १९९५: मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार.
 • २००३: स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर - मायकेल पी. अँडरसन, डेव्हिड ब्राउन, कल्पना चावला, लॉरेल क्लार्क, रिक डी. हसबंड, विली मॅककूल, इलान रमोन