MarathiMati.com - Android App on Google Play Store

९ डिसेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ डिसेंबर २०१३

९ डिसेंबर दिनविशेष(December 9 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

के. शिवराम कारंथ - (१० ऑक्टोबर, इ.स. १९०२ - ९ डिसेंबर, इ.स. १९९७) हे ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड भाषेतील साहित्यकार होते.

जागतिक दिवस


  • टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) : स्वातंत्र्य दिन

ठळक घटना, घडामोडी


  • १७९३ : अमेरिकन मिनर्व्हा, न्यूयॉर्कचे पहिले दैनिक प्रकाशित.
  • १८२४ : अयाकुशोची लढाई - ऍंतोनियो होजे दी सुकरच्या नेतृत्त्वाखाली पेरूच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्पॅनिश दलाला हरवून पेरू स्वतंत्र केले.
  • १८३५ : टेक्सासच्या गणराज्याने सान ऍंतोनियो जिंकले.
  • १८५६ : ईराणमधील बुशहरने ब्रिटीश लश्करासमोर शरणागति पत्करली.
  • १८८८ : अमेरिकन युद्ध खात्यात काम करणाऱया हर्मन हॉलेरिथने स्वत: तयार केलेले गणकयंत्र वापरण्यास सुरूवात केली.
  • १९३७ : दुसरे चीन-जपान युद्ध-नानजिंगची लढाई - लेफ्टेनंट जनरल असाका यासुहिकोच्या नेतृत्त्वाखाली जपानी सैन्याने नानजिंगवर हल्ला केला.
  • १९४० : दुसरे महायुद्ध - रिचर्ड ओ'कॉनोरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय व ब्रिटीश सैनिकांनी ईजिप्तच्या सिद बरानीतील ईटालियन सैन्यावर हल्ला केला.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध - चीनी गणराज्य, कोरियन गणराज्याचे तात्पुरते सरकार व क्युबाने जर्मनी व जपान विरूद्ध युद्ध पुकारले.
  • १९४५ : जनरल पॅटन जर्मनीमध्ये अपघातात जखमी.
  • १९४६ : न्युरेम्बर्ग खटला सुरू.
  • १९६१ : टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
  • १९९० : लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.

जन्म, वाढदिवस


  • १४४७ : चेंगह्वा, चीनी सम्राट.
  • १५०८ : गेम्मा फ्रिसियस, डच गणितज्ञ व नकाशेतज्ञ.
  • १५९४ : गुस्तावस अडोल्फस, स्वीडनचा राजा.
  • १६०८ : जॉन मिल्टन, इंग्लिश कवी.
  • १९१९ : ई. के. नयनार, केरळचा मुख्यमंत्री.
  • १९२३ : बॉब हॉक, ऑस्ट्रेलियाचा तेविसावा पंतप्रधान.
  • १९४६ : सोनिया गांधी, इटलीत जन्मलेली भारतीय राजकारणी.
  • १९८१ : दिया मिर्झा, भारतीय हिंदी अभिनेत्री.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ११६५ : माल्कम चौथा, स्कॉटलंडचा राजा.
  • १४३७ : सिगिस्मंड, पवित्र रोमन सम्राट.
  • १५६५ : पोप पायस चौथा.
  • १६६९ : पोप क्लेमेंट नववा.
  • १७०६ : पेद्रो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
  • १७६१ : ताराबाई, छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी.
  • १९४२ : द्वारकानाथ कोटणीस, मराठी-भारतीय डॉक्टर.
  • १९९७ : के. शिवराम कारंथ, अष्टपैलू कन्नड साहित्यिक.
MarathiMati.com - Android App on Google Play Store