MarathiMati.com - Android App on Google Play Store

८ डिसेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ८ डिसेंबर २०१३

८ डिसेंबर दिनविशेष(December 8 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

उदयशंकर - उदयशंकर चौधरी (बंगाली: উদয় শংকর) (डिसेंबर ८, १९०० - सप्टेंबर २६, १९७७) भारतीय नर्तक होते.

जागतिक दिवस


  • विद्यार्थी दिन (स्टुदेन्स्की प्राझ्निक) : बल्गेरिया.
  • मातृ दिन : पनामा.
  • संविधान दिन : रोमेनिया.
  • जागतिक मतिमंद पुनर्वसन दिन

ठळक घटना, घडामोडी


  • १९१४ : पहिले महायुद्ध-फॉकलंड बेटांचे युद्ध - कैझरलिक मरिन्सने ॲडमिरल ग्राफ मॅक्सिमिलियन फोन स्पीच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटीश नौदलावर हल्ला चढविला.
  • १९३७ : भारतीय पहिली दुमजली (डबल डेकर) बस मुंबईत धावू लागली.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला उत्तर देण्यास अमेरिकन काँग्रेसने जपानविरूद्ध युद्ध पुकारले.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेस पाठिंबा देण्यास चीनने जपानविरूद्ध युद्ध पुकारले.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध-हाँगकाँगचे युद्ध - आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला आठ तास होतात तो जपानने ब्रिटीश वसाहत असलेल्या हाँग काँगवर आक्रमण केले.
  • १९४१ : ज्यूंचे शिरकाण - लॉद्झ जवळील चेल्म्नो काँसेंट्रेशन कॅम्पमध्ये कैद्यांना मारण्यासाठी विषारी वायुवाहनांचा उपयोग प्रथमच केला गेला.
  • १९६६ : समुद्रातील वादळात ग्रीसची फेरी बोट हेराक्लियोन बुडाली. २०० ठार.
  • १९६९ : ऑलिम्पिक एरवेझचे डी.सी.६-बी. जातीचे विमान अथेन्सजवळ वादळात कोसळले. ९३ ठार.
  • १९७६ : ईगल्सनी हॉटेल कॅलिफोर्निया प्रकाशित केले.
  • १९८० : मार्क चॅपमनने न्यूयॉर्क मध्ये डकोटा बिल्डींगच्या बाहेर जॉन लेननचा खून केला.
  • १९८५ : सार्क परिषदेची स्थापना.
  • १९९१ : रशिया, बेलारूस व युक्रेनच्या नेत्यांनी सोवियेत संघराज्य विसर्जित केले व स्वतंत्र देशांचे राष्ट्रकुल स्थापन केले.
  • १९९८ : ताद्जेना कत्तल - अल्जीरियात अतिरेक्यांनी ८१ लोकांना ठार केले.
  • २००४ : रवींद्रनाथ टागोरांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रतिकृती स्वीडन सरकारने भेट म्हणून दिली.

जन्म, वाढदिवस


  • ६५ : होरेस, रोमन कवि.
  • १५४२ : मेरी स्टुअर्ट, मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स, स्कॉटलंडची राणी.
  • १६२६ : क्रिस्टीना, स्वीडनची राणी.
  • १७०८ : फ्रांसिस पहिला, पवित्र रोमन सम्राट.
  • १८६१ : चार्ल्स लेस्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९०० : उदयशंकर, जगद्विख्यात नर्तक.
  • १९१४ : अर्नी टोशॅक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९१७ : इयान जॉन्सन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९२२ : जॉर्ज फुलरटन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९३५ : धर्मेंद्र, प्रसिद्ध हिंदी अभिनेते.
  • १९३६ : पीटर पार्फिट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३६ : बस्टर फॅरर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४२ : हेमंत कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९४६ : वॉरेन स्टॉट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६७ : मेल्ट व्हान स्कूर, नामिबियाचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ८९९ : कॉरिंथियाचा आर्नुल्फ.
  • १६२६ : जॉन डेव्हीस, ब्रिटीश कवी.
  • १६३२ : फेलिपे व्हान लान्सबर्ग, फ्लेमिश अंतराळतज्ञ.
  • १९६३ : सरित धनरजता, थायलंडचा पंतप्रधान.
  • १९७८ : गोल्डा मायर, इस्रायेलची पंतप्रधान.
MarathiMati.com - Android App on Google Play Store