MarathiMati.com - Android App on Google Play Store

१ डिसेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १ डिसेंबर २०१३

१ डिसेंबर दिनविशेष(December 1 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

बा.सी.मर्ढेकर - बाळ सीताराम मर्ढेकर हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते.

जागतिक दिवस


  • लोकशिक्षण दिन (भारत)
  • एड्स प्रतिबंधक दिन

ठळक घटना, घडामोडी


  • १६४० : पोर्तुगालला स्पेनपासून स्वातंत्र्य. होआव चौथा, पोर्तुगाल राजेपदी.
  • १८२२ : पेद्रो पहिला ब्राझिलचा सम्राट झाला.
  • १८३५ : हान्स क्रिस्चियन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
  • १९५८ : मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६३ : नागालँड भारताचे १६वे राज्य झाले.
  • १९६५ : भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना.
  • १९७३ : पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य.
  • १९७४ : टी.डब्ल्यू.ए. फ्लाइट ५१४ वॉशिंग्टन डलेस ईंटरनॅशनल विमानतळाच्या वायव्येस कोसळली. ९२ ठार.
  • १९८१ : युगोस्लाव्हियाच्या आयनेक्स एड्रिया एव्हियोप्रोमेत विमानकंपनीचे डी.सी. ९ जातीचे विमान कोर्सिकामध्ये कोसळले. १७८ ठार.
  • २००१ : ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे शेवटचे उड्डाण.

जन्म, वाढदिवस


  • १०८१ : लुई सहावा, फ्रांसचा राजा.
  • १०८३ : ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार.
  • १८८५ : काकासाहेब कालेलकर, मराठी, गुजराती लेखक, इतिहासकार, पत्रकार, गांधीवादी.
  • १९०९ : बा. सी. मर्ढेकर, मराठी कवी व लेखक.
  • १९८० : मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ११३५ : हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा.
  • १९७३ : डेव्हिड बेन गुरियन, इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान.
MarathiMati.com - Android App on Google Play Store