MarathiMati.com - Android App on Google Play Store

५ डिसेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ डिसेंबर २०१३

५ डिसेंबर दिनविशेष(December 5 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

नेल्सन मंडेला - (जुलै १८, १९१८ - डिसेंबर ५, २०१३) हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेते होते.

जागतिक दिवस


  • आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन

ठळक घटना, घडामोडी


  • १४८४ : पोप इनोसंट आठव्याने समिस देसिदरांतेस हा पोपचा फतवा (papal bull) काढला व त्याद्वारे हाइन्रिक क्रेमर व जेकब स्प्रेन्गर यांची सत्यशोधकपदी नेमणूक केली. त्यांची प्रमुख कामगिरी होती जर्मनी मधील तथाकथित चेटूक व जादूटोणा शोधून त्याचा नायनाट करणे. हे 'सत्यशोधन' म्हणजे जर्मनीच्या ईतिहासातील अतिकठोर प्रकरणांपैकी एक होय.
  • १४९२ : क्रिस्टोफर कोलंबसने हिस्पॅनियोला बेटावर पाय ठेवला व नव्या जगात पाउल ठेवणारा पहिला युरोपियन ठरला.
  • १५६० : फ्रांसचा राजा फ्रांसिस दुसरा याचा मृत्यू. चार्ल्स नववा राजेपदी.
  • १५९० : निक्कोलो स्फोन्द्राती ग्रेगोरी चौदावा म्हणून पोपपदी.
  • १९३२ : जर्मनीत जन्मलेल्या व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असलेल्या अल्बर्ट आइनस्टाइनला अमेरिकेचा व्हिसा प्रदान.
  • १९४५ : फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब.
  • १९८९ : फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला.

जन्म, वाढदिवस


  • १३७७ : ज्यान्वेन, चीनी सम्राट.
  • १४४३ : पोप ज्युलियस दुसरा.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ७४९ : दमास्कसचा संत जॉन.
  • १५६० : फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा.
  • १७९१ : वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार.
  • १९२६ : क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार.
  • २०१३ : नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता.
MarathiMati.com - Android App on Google Play Store