४ डिसेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ डिसेंबर २०१३

४ डिसेंबर दिनविशेष(December 4 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

इंद्रकुमार गुजराल - (डिसेंबर ४, इ.स. १९१९ - नोव्हेंबर २९, इ.स. २०१२) हे भारताचे ११ वे पंतप्रधान होते.

जागतिक दिवस


 • नौदल दिन

ठळक घटना/घडामोडी


 • ७७१ : कार्लोमानचा मृत्यू. शार्लमेन फ्रँकिश सम्राटपदी.
 • १८२९ : भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्‍यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला.
 • १८७२ : ब्रिटीश आरमारी नौकेला मेरी सेलेस्त हे अमेरिकन जहाज समुद्रात प्रवासी किंवा खलाशांशिवाय तरंगत असलेले आढळले.
 • १९१८ : पहिले महायुद्ध : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन व्हर्सायच्या तहासाठी फ्रांसला जाण्यास रवाना. राष्ट्राध्यक्ष असताना युरोपला भेट देणारा विल्सन पहिलाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होता.
 • १९२४ : गेटवे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.
 • १९४३ : दुसरे महायुद्ध : युगोस्लाव्हियाने परागंदा सरकार स्थापन केले.
 • १९५२ : लंडनवर थंड धुके पसरले. पुढील काही आठवड्यांत या धुक्या व प्रदूषणामुळे १२,००० पेक्षा अधिक मृत्यू.
 • १९५४ : मायामी, फ्लोरिडा येथे पहिले बर्गर किंग सुरू झाले.
 • १९५८ : डाहोमी (आताचे बेनिन)ला फ्रांसच्या आधिपत्याखाली स्वायत्तता.
 • १९७१ : भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली.
 • १९७१ : भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध-ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला.
 • १९७१ : अल्स्टर व्हॉलंटीयर फोर्सने लावलेल्या बॉम्बच्या स्फोटात बेलफास्टमध्ये १५ ठार, १७ जखमी.
 • १९७७ : मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ६५३ या विमानाचे अपहरण. नंतर तांजोंग कुपांग येथे विमान कोसळून १०० ठार.
 • १९८४ : चीनने नवीन संविधान अंगिकारले.
 • १९८४ : हिझबोल्लाहने कुवैत एरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले व चार प्रवाशांना ठार मारले.
 • १९९१ : ओलिस धरलेल्या अमेरिकन पत्रकार टेरी अँडरसनची बैरुतमध्ये सात वर्षांनी सुटका.
 • २००८ : कॅनडाची संसद बरखास्त.

जन्म/वाढदिवस


 • १५५५ : हाइनरिक मैबॉम, जर्मन कवी व इतिहासकार.
 • १५९५ : ज्यॉँ चेपलेन, फ्रेंच लेखक.
 • १६१२ : सॅम्युएल बटलर, इंग्लिश कवी.
 • १७९५ : थॉमस कार्लाईल, इंग्लिश लेखक व इतिहासकार.
 • १८४० : क्रेझी हॉर्स, अमेरिकेतील ओग्लाला सू जमातीचा नेता.
 • १८५२ : ओरेस्ट ख्वोल्सन, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८९२ : फ्रांसिस्को फ्रँको, स्पेनचा हुकुमशहा.
 • १९१९ : इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान.
 • १९३२ : रोह तै-वू, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९४३ : फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन