MarathiMati.com - Android App on Google Play Store

२३ डिसेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २३ डिसेंबर २०१३

२३ डिसेंबर दिनविशेष(December 23 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

के. शिवराम कारंथ - (१० ऑक्टोबर, इ.स. १९०२ - २३ डिसेंबर, इ.स. १९९७) हे ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड भाषेतील साहित्यकार होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • ६१९ : बॉनिफेस पाचवा पोपपदी.
  • १७८३ : जॉर्ज वॉशिंग्टनने काँटिनेंटल आर्मीचे सरसेनापतिपद सोडले.
  • १८८८ : व्हिंसेंट व्हॅन गोने आपल्या डाव्या कानाची पाळी कापून रेचेल नावाच्या नगरवधूला भेट दिली.
  • १९१३ : अमेरिकन अध्यक्ष वूड्रो विल्सनने फेडरल रिझर्व ऍक्टवर सही केली. फेडरल रिझर्व बँक अस्तित्त्वात.
  • १९१६ : पहिले महायुद्ध-मगधाबाची लढाई - दोस्त सैन्याने साइनाई, ईजिप्तमध्ये तुर्कीला पराभूत केले.
  • १९४० : हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना तत्कालिन म्हैसूर राज्यात बँगलोर येथे प्रसिद्ध उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी सुरू केला. 'हिंदुस्थान एअरक्रॉफ्ट लिमिटेड' कंपनीचे पुढे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नामांतर झाले.
  • १९४७ : बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.
  • १९५४ : डॉ.जोसेफ ई. मरेने बॉस्टनच्या पीटर बेन्ट ब्रिगहॅम हॉस्पिटलमध्ये पहिले मानव मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले.
  • १९७२ : निकाराग्वाची राजधानी मानाग्वामध्ये ६.५ रिश्टरचा भूकंप. १०,०००हून अधिक ठार.
  • १९७२ : उरुग्वेयन एर फोर्स फ्लाइट ५७१च्या उरलेल्या प्रवाशांना वाचविण्यात आले. अँडीझ पर्वतरांगेवर विमान कोसळल्यावर ७२ दिवस अतिउंच व अतिथंड परिस्थितीत राहताना जगण्यासाठी प्रवाश्यांनी नाईलाजाने मानवमांस खाल्ले. २ प्रवाश्यांनी १० दिवस अतिकठीण डोंगर पार करून काही प्रवासी जिवंत असल्याची माहिती दिली.
  • १९७९ : सोवियेत सैन्याने अफगाणिस्तानची राजधानी काबुल काबीज केले.
  • २००२ : इराकी मिग २५ प्रकारच्या विमानाने अमेरिकेचे एम.क्यू. १ प्रकारचे विमान पाडले. चालकविरहीत लढाऊ विमानाने द्वंद्व युद्धात भाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती.
  • २००४ : मॅकारी द्वीपांना रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.१ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का.
  • २००५ : अझरबैजान एरलाइन्स फ्लाइट २१७ हे बाकु हून अक्टाऊ शहराकडे जाणारे विमान उड्डाण केल्यावर लगेचच कोसळले. २३ ठार.
  • २००५ : डिसेंबर १८ला अड्रे शहरावर झालेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून चाडने सुदान विरुद्ध युद्ध पुकारले.

जन्म, वाढदिवस


  • १५३७ : योहान तिसरा, स्वीडनचा राजा.
  • १७७७ : झार अलेक्झांडर पहिला, रशियाचा झार.
  • १८०५ : जोसेफ स्मिथ, जुनियर, चर्च ऑफ जिझस क्राईस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स(मोर्मोन चर्च)चा संस्थापक.
  • १८४५ : रासबिहारी घोष, प्रसिद्ध कायदेपंडित, देशभक्त. काँग्रेस पक्षाचे नेते आणि अध्यक्ष.
  • १९१८ : हेल्मुट श्मिट, जर्मनीचा चान्सेलर.
  • १९३३ : अकिहितो, जपानचा सम्राट.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


MarathiMati.com - Android App on Google Play Store