२० डिसेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० डिसेंबर २०१३

२० डिसेंबर दिनविशेष(December 20 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

के. शिवराम कारंथ - (१० ऑक्टोबर, इ.स. १९०२ - २० डिसेंबर, इ.स. १९९७) हे ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड भाषेतील साहित्यकार होते.

जागतिक दिवस


 • टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) : स्वातंत्र्य दिन

ठळक घटना/घडामोडी


 • १५२२ : नाइट्स ऑफ ऱहोड्सची सुलेमान द मॅग्निफिसन्टपुढे शरणागति. जीवनदान मिळालेले हे सरदार माल्टात वसले व नाइट्स ऑफ माल्टा म्हणून प्रसिद्ध झाले.
 • १८०३ : लुईझियाना खरेदी पूर्ण.
 • १८६० : दक्षिण कॅरोलिना युनायटेड स्टेट्सपासून फुटून निघाले.
 • १९१७ : रशियात पहिल्या गुप्त पोलिस संस्थेची (चेका) स्थापना.
 • १९५२ : अमेरिकन हवाई दलाचे सी.१२४ जातीचे विमान वॉशिंग्टन राज्यात मोझेस लेक येथे कोसळले. ८७ ठार
 • १९७३ : स्पेनच्या पंतप्रधान ॲडमिरल लुइस कारेरो ब्लांकोचा माद्रिदमध्ये कार बॉम्बने खून.
 • १९८९ : ऑपरेशन जस्ट कॉझ - अमेरिकेने पनामातील मनुएल नोरिगाचे सरकार उलथविण्यासाठी सैन्य पाठविले.
 • १९९५ : नाटोचे शांतिसैन्य बॉस्नियामध्ये दाखल.
 • १९९५ : अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट ९६५ हे बोईंग ७५७ जातीचे विमान कोलंबियात कालीजवळ कोसळले. १६० ठार.
 • १९९९ : पोर्तुगालने मकाउचे बेट चीनला परत केले.
 • २००१ : आर्थिक अडचणीत सापडलेल्या आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो दि ला रुआला राजीनामा देणे भाग पडले.

जन्म/वाढदिवस


 • १५३७ : जॉन तिसरा, स्वीडनचा राजा.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन