१३ डिसेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ डिसेंबर २०१३

१३ डिसेंबर दिनविशेष(December 13 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

स्मिता पाटील - (ऑक्टोबर १७, इ.स. १९५५ - डिसेंबर १३, इ.स. १९८६) ह्या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणाऱ्या मराठी आणि हिंदी अभिनेत्री होत्या.

जागतिक दिवस


 • माल्टा : प्रजासत्ताक दिन

ठळक घटना/घडामोडी


 • १५४५ : ट्रेंटची समिती सुरू.
 • १५७७ : सर फ्रांसिस ड्रेक पृथ्वी प्रदक्षिणेला प्लिमथ, इंग्लंड येथून निघाला.
 • १६४२ : एबेल जान्स्झून तास्मान न्यू झीलँडला पोचला.
 • १८६२ : अमेरिकन यादवी युद्ध - फ्रेडरिक्सबर्गच्या लढाईत कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ई. लीने युनियन जनरल ऍम्ब्रोस ई. बर्नसाइडला हरविले.
 • १९३७ : दुसरे चीनी-जपानी युद्ध-नानजिंगची लढाई - जपानी सैन्याने नानजिंग काबीज केले.
 • १९३८ : ज्यूंचे शिरकाण - साख्सेनहौसेनहून आणलेल्या १०० कैद्यांनी हांबुर्गजवळील नॉएनगॅम कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प बांधला.
 • १९३९ : दुसरे महायुद्ध-रिव्हर प्लेटची लढाई - ब्रिटीश नौदलाच्या क्रुझर एच.एम.एस. एक्झेटर, एच.एम.एस. अजॅक्स व एच.एम.एन.झेड.एस. अकिलिसशी दिलेल्या झुंजीत पराभव अटळ दिसत असता जर्मनीच्या कॅप्टन हान्स लँग्सडॉर्फने आपली पॉकेट बॅटलशिप ॲडमिरल ग्राफ स्पी बुडविली.
 • १९४१ : दुसरे महायुद्ध - हंगेरी व रोमेनियाने अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारले.
 • १९७४ : माल्टा गणतंत्र झाले.
 • १९७७ : अमेरिकन सरकारचे डी.सी.३ जातीचे विमान एव्हान्सव्हिल प्रादेशिक विमानतळाजवळ कोसळले. २९ ठार. मृतांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ एव्हान्सव्हिलचा बास्केटबॉल संघ.
 • १९८१ : पोलंडमध्ये जनरल वॉयसियेक यारूझेल्स्कीने लश्करी कायदा (मार्शल लॉ) लागू केला.
 • १९९६ : कोफी अन्नान संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसपदी.
 • २००० : आदल्या दिवशी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बुश वि. गोर खटल्याच्या निकालानंतर अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ऍल गोरनी हार मान्य केली.
 • २००१ : पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचार्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
 • २००२ : ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
 • २००२ : सायप्रस, चेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, लात्व्हिया, लिथुएनिया, माल्टा, पोलंड, व्हेकिया व स्लोव्हेनिया या देशांना युरोपीय संघात मे १, २००५ ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर.
 • २००३ : इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला तिक्रीतजवळ पकडले.
 • २००३ : प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर.

जन्म/वाढदिवस


 • १५२१ : पोप सिक्स्टस पाचवा.
 • १५३३ : एरिक चौदावा, स्वीडनचा राजा.
 • १५५३ : चौथा हेन्‍री, फ्रान्सचा राजा.
 • १५८५ : हॉथोर्न्डेनचा विल्यम ड्रमोंड, स्कॉटिश कवी.
 • १६७८ : याँग्झेंग, चीनी सम्राट.
 • १८१६ : वेर्नर बॉन सीमेन्स, सीमेन्स उद्योग समूहाचा पाया घालणार्‍या सीमेन्सचा जन्म
 • १८१८ : मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.
 • १८५४ : थॉमस वॉट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस.
 • १९१३ : आर्ची मूर, मुष्टियोद्धा
 • १९२४ : विद्याधर पुंडलिक, साहित्यिक
 • १९२८ : सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १०४८ : अल बिरूनी, ईराणी गणितज्ञ.
 • ११२४ : पोप कॅलिक्स्टस दुसरा.
 • १२०४ : फ्रेडरिक दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
 • १९८६ : स्मिता पाटील, हिंदी चित्रपट अभिनेत्री
 • १९९४ : विश्‍वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक.
 • १९९६ : श्रीधर पुरुषोत्तम लिमये ऊर्फ शिरुभाऊ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक.
 • २००५ : रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक.