MarathiMati.com - Android App on Google Play Store

१२ डिसेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १२ डिसेंबर २०१३

१२ डिसेंबर दिनविशेष(December 12 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

बाबू गेनू सैद - (इ.स. १९०८; महाळुंगे पडवळ ता. आंबेगाव, महाराष्ट्र - डिसेंबर १२, इ.स. १९३०; मुंबई, महाराष्ट्र) हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेला स्वातंत्र्यसैनिक होता.

जागतिक दिवस


  • केन्या : स्वातंत्र्य दिन.

ठळक घटना, घडामोडी


  • ६२७ : निनेवेहची लढाई - हेराक्लियसच्या बायझेन्टाईन सैन्याने खुस्रो दुसर्‍याच्या पर्शियन सैन्याला हरविले.
  • १०९८ : पहिली क्रुसेड - मा'अरात अल् नुमानची कत्तल - शहराची तटबंदी फोडून क्रुसेडर आत घुसले व २०,००० रहिवाश्यांची कत्तल उडविली. शहरात पुरेसे अन्न न मिळाल्याने त्यांनी मानवमांस खाल्ले.
  • १७१९ : बॉस्टन गॅझेटचे प्रकाशन.
  • १७८१ : अमेरिकन क्रांती-उशान्तची दुसरी लढाई - रिअर ॲडमिरल रिचर्ड केम्पेनफेल्टच्या एच.एम.एस.व्हिक्टरी या युद्धनौकेच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश नौदलाच्या स्क्वॉड्रनने फ्रेंच तांड्याला हरविले.
  • १७८७ : पेनसिल्व्हेनिया अमेरिकेचे संविधान मान्य करणारे दुसरे राज्य ठरले.
  • १९०१ : न्यू फाउंडलंडमधील सेंट जॉन गावातील सिग्नल हिल येथे गुग्लियेल्मो मार्कोनीने प्रथम अटलांटिक महासागरापलीकडचा रेडियो संदेश पकडला.
  • १९११ : ब्रिटीश ईस्ट ईंडीया कंपनीने भारताची राजधानी कोलकातायेथून दिल्लीला हलविली.
  • १९२५ : इराणच्या मजलिसने रझा खानची शाहपदी निवड केली.
  • १९३९ : हिवाळी युद्ध-तोल्वाजार्विची लढाई - फिनलंडच्या सैन्याने प्रथम सोवियेत युनियनविरूद्ध विजय मिळविला.
  • १९४१ : ब्रिटनने बल्गेरियाविरूद्ध युद्ध पुकारले.
  • १९६३ : केन्याला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य मिळाले.
  • १९६४ : जोमो केन्याटा केन्याच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९७९ : ऱहोडेशियाचे नामांतर. नवीन नाव झिम्बाब्वे.
  • १९८५ : ऍरो एर फ्लाइट १२८५ हे डी.सी.८ जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील गॅन्डर विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या १०१व्या एरबॉर्न डिव्हिजनचे २४८ सैनिक.
  • १९९० : पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला.
  • २००१ : भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी.
  • २००० : अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी.

जन्म, वाढदिवस


  • १२९८ : ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक आल्बर्ट दुसरा.
  • १५७४ : डेन्मार्कची ऍन, इंग्लंडचा राजा जेम्स पहिला याची राणी.
  • १८७२ : बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.
  • १९४० : शरद पवार, भारतीय राजकारणी.
  • १९५० : रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, भारतीय अभिनेता.
  • १९८१ : युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ८८४ : कार्लोमान, पश्चिमी फ्रँक्सचा राजा.
  • १५७४ : सलीम दुसरा, ऑटोमन सुलतान.
  • १६८५ : जॉन पेल, ब्रिटिश गणितज्ञ.
  • १८४३ : विल्यम पहिला, नेदरलँड्सचा राजा.
  • १९१३ : मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.
  • १९३० : बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना.
  • १९९२ : पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक.
  • १९९२ : जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • २००४ : निरंजन उजगरे, मराठी कवी.
MarathiMati.com - Android App on Google Play Store