ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | August Month in History - Page 3

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष - [August Month in History] ऑगस्ट महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

इरावती कर्वे | Irawati Karve

११ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

इरावती कर्वे - (१५ डिसेंबर १९०५ - ११ ऑगस्ट १९७०) या मराठी लेखिका होत. मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे.

अधिक वाचा

विक्रम साराभाई | Vikram Sarabhai

१२ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

विक्रम साराभाई - (१२ ऑगस्ट १९१९ - ३० डिसेंबर १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

अधिक वाचा

प्रल्हाद केशव अत्रे | Pralhad Keshav Atre

१३ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

प्रल्हाद केशव अत्रे - (१३ ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९) आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. फार काय, आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते.

अधिक वाचा

खाशाबा जाधव | Khashaba Jadhav

१४ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

खाशाबा जाधव - (१५ जानेवारी १९२६ - १४ ऑगस्ट १९८४) हे ऑलिंपिकपदकविजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.

अधिक वाचा

भारतीय स्वातंत्र्य दिन | Independence Day India

१५ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

भारतीय स्वातंत्र्य दिन - भारतीय स्वातंत्र्यदिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.

अधिक वाचा