Download MarathiMati.com's New Android App from Google Play

९ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ ऑगस्ट २०१३

ऑगस्ट क्रांती/भारत छोडो आंदोलन | Quit India Movement

ऑगस्ट क्रांती/भारत छोडो आंदोलन - हे ऑगस्ट १९४२ मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सूरू झालेले नागरी असहकार आंदोलन होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली होती.

जागतिक दिवस


  • राष्ट्र दिन: सिंगापुर.
  • राष्ट्रीय महिला दिन: दक्षिण आफ्रिका.
  • १९४२: ऑगस्ट क्रांतीदिन.

ठळक घटना/घडामोडी


  • १०४८: २३ दिवस पोपपदी राहिल्यावर पोप दमासस दुसऱ्याचा मृत्यू.
  • ११७३: पिसाच्या मिनाऱ्याचे बांधकाम सुरू. बांधकाम संपण्यास २०० वर्षे लागलेला हा मिनारा चुकीने कलता बांधला गेला.
  • १८६२: अमेरिकन यादवी युद्ध - सीडर माउंटनची लढाई.
  • १९०२: एडवर्ड सातवा इंग्लंडच्या राजेपदी.
  • १९२५: भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेगाडीची लूट
  • १९४२: चले जाव आंदोलन - मुंबईत महात्मा गांधींना अटक.
  • १९४५: जपानच्या नागासाकी शहरावर अमेरिकेने परमाणु बॉम्ब टाकला. ७०-९०,००० व्यक्ती काही क्षणांत ठार, असंख्य जखमी. इतर हजारो व्यक्ती पुढील काही वर्षात आजाराने मृत्युमुखी.
  • १९६५: अमेरिकेतील लिटल रॉक, आर्कान्सा येथील क्षेपणास्त्र तळावर आग. ५३ ठार.
  • १९७४: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनच्या राजीनाम्यानंतर जेरी फोर्ड राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९८७: ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात १९ वर्षीय ज्युलियन नाइटने अंदाधुंद गोळ्या चालवुन ९ व्यक्तींना ठार मारले. इतर १९ जखमी.
  • १९८९: कैफु तोशिकी जपानच्या पंतप्रधानपदी.
  • १९९३: आल्बर्ट दुसरा बेल्जियमच्या राजेपदी.
  • २०००: अमेरिकेच्या बर्लिंग्टन, न्यू जर्सी शहराजवळ पायपर नवाहो व पायपर सेमिनोल प्रकारच्या विमानांची हवेत टक्कर. ११ ठार.
  • २००१: इस्रायेलची राजधानी जेरुसलेममध्ये दहशतवाद्यांच्या बॉम्बहल्ल्यात १५ ठार व १३० जखमी.

जन्म/वाढदिवस


  • १९०२: एडवर्ड क्लार्क, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९०९: विनायक कृष्ण (व्ही.के.) गोकाक, कानडीभाषेतील लेखक
  • १९११: खुरशेद मेहेरहोमजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९१९: जूप डेन उइल, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
  • १९२६: डेव्हिड ऍटकिन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९३९: रोमानो प्रोडी, इटलीचा पंतप्रधान.
  • १९५७: मेलानी ग्रिफिथ, अमेरिकन अभिनेत्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • ११७: ट्राजान, रोमन सम्राट.
  • ३७८: व्हॅलेन्स, रोमन सम्राट.
  • ११०७: गो-होरिकावा, जपानी सम्राट.
  • १२५०: एरिक चौथा, डेन्मार्कचा राजा.
  • १९०१: विष्णुदास भावे, मराठी नाट्यपरंपरेचे जनक.
  • १९६२: हर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.
  • १९६७: ज्यो ऑर्टन, इंग्लिश लेखक.
  • १९६९: सेसिल फ्रँक पोवेल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play