Download MarathiMati.com's New Android App from Google Play

७ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ ऑगस्ट २०१३

रवींद्रनाथ टागोर | Rabindranath Tagore

रवींद्रनाथ टागोर - उर्फ रवींद्रनाथ ठाकूर (७ मे १८६१ - ७ ऑगस्ट १९४१) ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेलविजेते होते.

जागतिक दिवस


  • स्वातंत्र्य दिन: कोट दि आयव्होर.
  • मुक्ती दिन: टर्क्स व कैकोस द्वीप.

ठळक घटना/घडामोडी


  • १७९४: व्हिस्की क्रांती - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील शेतकर्‍यांनी व्हिस्की व अन्य गाळीव मद्यावरील कराविरुद्ध आंदोलन सुरू केले.
  • १८१९: बॉयाकाची लढाई - सिमोन बॉलिव्हारच्या सैन्याने स्पेनच्या सैन्याचा पाडाव केला.
  • १८८८: लंडनमध्ये जॅक द रिपरने पहिला खून केला.
  • १९४२: दुसरे महायुद्ध - ग्वादालकॅनालची लढाई सुरू.
  • १९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने जपानच्या हिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला सफल झाल्याचे जाहीर केले.
  • १९४७: थॉर हायरडाल व त्याच्या चमूने बाल्सा लाकडाच्या तराफ्यातून १०१ दिवसात पॅसिफिक समुद्र पार केला.
  • १९४७: मुंबई महापालिकेने बेस्ट कंपनी आपल्या अधिकारात घेतली.
  • १९६०: कोट दि आयव्होरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६४: व्हियेतनाम युद्ध - अमेरिकन काँग्रेसने टोंकिनच्या अखातातील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्राध्यक्षलिंडन बी. जॉन्सनला सर्वाधिकार दिले.
  • १९६५: सिंगापुरची मलेशियामधून हकालपट्टी.
  • १९६७: व्हियेतनाम युद्ध - चीनने उत्तर व्हियेतनामला मदत करण्याचे जाहीर केले.
  • १९७६: व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले.
  • १९९१: सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध.
  • १९९७: फाइन एर फ्लाइट १०१ हे मालवाहू विमान फ्लोरिडातील मायामी शहरात कोसळले. ५ ठार.
  • १९९८: टांझानिया व केन्यामधील अमेरिकन वकिलातींवर दहशतवाद्यांचा बॉम्बहल्ला. २२४ ठार, ४,५०० जखमी.

जन्म/वाढदिवस


  • ३१७: कॉन्स्टेन्टियस दुसरा, रोमन सम्राट.
  • १८१६: माटा हारी, डच गुप्तहेर.
  • १९२५: एम.एस. स्वामीनाथन, भारतीय शेतीतज्ञ.
  • १९३७: डॉन विल्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४०: ज्यॉँ-लुक डेहेन, बेल्जियमचा पंतप्रधान.
  • १९४८: ग्रेग चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू व मार्गदर्शक.
  • १९५९: अली शाह, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६६: जिमी वेल्स, विकिपिडीयाचा स्थापक.
  • १९७१: डॉमिनिक कॉर्क, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • ४६१: माजोरियन, रोमन सम्राट.
  • ४७९: युराकु, जपानी सम्राट.
  • ११०६: हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट.
  • १८५५: मेरियानो अरिस्ता, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४१: रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता.
  • १९७३: जॅक ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • २००४: रेड अडेर, अमेरिकेचा अग्निशमनतज्ञ.
  • २००५: पीटर जेनिंग्स, अमेरिकेचा वार्ताहर.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play