MarathiMati.com - Android App on Google Play Store

५ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २०१३

५ ऑगस्ट दिनविशेष(August 5 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

महामहोपाध्याय दत्तात्रेय वामन पोतदार - ऊर्फ दत्तो वामन पोतदार (ऑगस्ट ५, १८९० - ऑक्टोबर ६, १९७९) हे मराठी इतिहासकार, लेखक व वक्ते होते. १९६१ ते १९६४ सालांदरम्यान ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.

जागतिक दिवस


  • स्वातंत्र्य दिन : बर्किना फासो.
  • विजयदिन, मातृभूमी आभार दिन : क्रोएशिया.
  • बाल दिन : चिली.

ठळक घटना, घडामोडी


  • ११०० : हेन्री पहिला इंग्लंडच्या राजेपदी.
  • १३०५ : स्कॉटिश क्रांतीकारी विल्यम वॉलेस ग्लासगो जवळ पकडला गेला.
  • १८६० : कार्ल चौथा स्वीडनच्या राजेपदी.
  • १८६१ : अमेरिकन यादवी युद्ध - युद्धाच्या खर्चास हातभार लागावा म्हणून अमेरिकन सरकारने प्रथमतः आयकर लागू केला.
  • १८८२ : जपानमध्ये लश्करी कायदा लागू.
  • १९०१ : पीटर ओ'कॉनोरने २४ फूट ११.७५ ईंच लांब उडी मारून विश्वविक्रम रचला.
  • १९१४ : जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरात सुरू झाला.
  • १९४४ : दुसरे महायुद्ध - ऑस्ट्रेलियाच्या कौरा गावाजवळील युद्धबंद्यांच्या तुरुंगातून ५४५ जपानी युद्धबंदी पळाले. बव्हंशी मारले गेले व उरलेल्यांपैकी मोठ्या संख्येने आत्महत्या केली.
  • १९४४ : ज्यूंचे शिरकाण - पोलिश क्रांतीकार्‍यांनी वॉर्सोतील कारागृहातून ३४८ बंद्यांची सुटका केली.
  • १९४९ : इक्वेडोरमध्ये भूकंप. ६,००० ठार.
  • १९६० : बर्किना फासोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६२ : मॅरिलिन मन्रोने आत्महत्या केली.
  • १९६२ : दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेलाला कैद. २८ वर्षांनी १९९०मध्ये सुटका.
  • १९६४ : व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेच्या यु.एस.एस. टिकोंडेरोगा व यु.एस.एस. कॉन्स्टेलेशन या विमानवाहू युद्धनौकांवरील विमानांनी टोंकिनच्या अखातातील हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून उत्तर व्हियेतनामवर बॉम्बफेक केली. वस्तुतः टोंकिनच्या अखातातील हल्ला ही बनावट घटना होती.
  • १९८१ : अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनने संपावर असलेल्या ११,३८१ हवाई वाहतूक नियंत्रकांना नोकरीतून काढून टाकले.
  • १९९५ : क्रोएशियाच्या सैन्याने सर्बियातील क्निन शहर जिंकले.
  • २००६ : मराठी विकिपिडीयाने ५,००० लेखांचा टप्पा ओलांडला.
  • २०१२ : अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ओक क्रीक शहरातील गुरुद्वारामध्ये घुसून एका माथेफिरूने गोळीबार केला. सहा व्यक्ती ठार. हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले.

जन्म, वाढदिवस


  • १८०२ : नील्स हेन्रिक एबेल, नॉर्वेजियन गणितज्ञ.
  • १८१५ : देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १८१५ : एडवर्ड जॉन आयर, इंग्लिश शोधक.
  • १८६६ : हॅरी ट्रॉट, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
  • १८९० : दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
  • १९०८ : हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा १७वा पंतप्रधान.
  • १९६२ : रिचर्ड डि ग्रोएन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६६ : अतुल समरसेकरा, श्रीलंकी क्रिकेट खेळाडू.
  • १९६९ : वेंकटेश प्रसाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६९ : व्हॅस्बर्ट ड्रेक्स, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७२ : आकिब जावेद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : सनवर होसेन, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ८८२ : लुई तिसरा, फ्रांसचा राजा.
  • १३६४ : कोगोन, जपानी सम्राट.
  • १९४४ : मॉरिस टर्नबुल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
MarathiMati.com - Android App on Google Play Store