२६ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ ऑगस्ट २०१४

मदर तेरेसा | Mother Teresa

मदर तेरेसा - (२६ ऑगस्ट १९१० - ५ सप्टेंबर १९९७) या भारतरत्न आणि नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १३०३: अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगढ जिंकले.
  • १८६२: अमेरिकन यादवी युद्ध - बुल रनची दुसरी लढाई सुरू.
  • १९१४: पहिले महायुद्ध - जर्मनीच्या टोगोलँड या वसाहतीवर फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्यांनी आक्रमण केले.
  • १९२०: अमेरिकेच्या संविधानातील १९वी दुरुस्ती अमलात आली व स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
  • १९४२: ज्यूंचे शिरकाण युक्रेनच्या चोर्तकिव शहरात जर्मन पोलिसांनी ज्यूंना घराघरातून बाहेर काढले. ५०० आजारी व बालकांची हत्या करून उरलेल्यांना रेल्वेच्या वाघिणींतून छळछावणीत पाठवून दिले.
  • १९६६: नामिबियाचे स्वातंत्र्ययुद्ध - ओमुगुलुग्वोंबाशेची लढाई.
  • १९७८: पोप जॉन पॉल पहिला पोपपदी.
  • १९९७: अल्जीरियात बेनी-अली हत्याकांडात सुमारे १०० ठार.
  • २००८: रशियाने जॉर्जियाचे अबखाझिया आणि दक्षिण ओसेशिया हे प्रांत स्वतंत्र असल्याचे परस्पर जाहीर केले.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १९४८: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, 'केसरी'चे संपादक
  • १९५५: अ. ना. भालेराव, मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक
  • १९९९: नरेंद्रनाथ, भारतीय टेनिसपटू
  • १९५५: बालन के. नायर, मल्याळी चित्रपट अभिनेते