Download MarathiMati.com's New Android App from Google Play

२३ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑगस्ट २०१४

शामू - सीवर्ल्डमधील ओर्का देवमासा | Shamu SeaWorld show

शामू - सीवर्ल्डमधील ओर्का देवमासा.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १३०५: देशद्रोहाच्या आरोपावरुन स्कॉटलंडच्या विल्यम वॉलेसचा वध.
  • १६३२: विजापूरच्या आदिलशहाचा वजीर मरार जगदेव याने परिंडा किल्ल्यावर मोगलांच्या ताब्यात असलेली मुलुक-ए-मैदान तोफ विजापूर येथे आणली.
  • १७०८: मैडिंग्नु पम्हैबाचा मणिपूरच्या राजेपदी राज्याभिषेक.
  • १७७५: इंग्लंडच्या राजा तिसर्‍या जॉर्जने अमेरिकेतील वसाहतींनी उठाव केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.
  • १८६६: प्रागचा तह - ऑस्ट्रिया व प्रशियातील युद्ध संपुष्टात आले.
  • १९१४: पहिले महायुद्ध - जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली.
  • १९२९: हेब्रॉन हत्याकांड - हेब्रॉन शहरात अरब दहशतवाद्यांनी सुमारे ६५ ज्यू व्यक्तींना ठार मारले व उरलेल्यांची हकालपट्टी केली.
  • १९३८: इंग्लंडच्या लेन हटनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३६४ धावांची विक्रमी खेळी केली.
  • १९३९: दुसरे महायुद्ध-मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार - या कराराच्या गुप्त अटींनुसार जर्मनी व सोवियेत संघाने बाल्टिक देश, फिनलंड, रोमेनिया व पोलंडची आपापसात वाटणी करून घेतली.
  • १९४२: दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई सुरू.
  • १९४३: दुसरे महायुद्ध-खार्कोव्ह शहराचा वेढा फुटला.
  • १९४४: दुसरे महायुद्ध-मार्सेल शहराचा वेढा फुटला.
  • १९४४: दुसरे महायुद्ध - रोमेनियाने अक्ष राष्ट्रांचा साथ सोडून दोस्त राष्ट्रांशी संधान बांधले.
  • १९४४: अमेरिकन सैन्याचे बी-२४ प्रकारचे विमान इंग्लंडच्या फ्रेकलटन शहरातील शाळेवर पडले. ६१ ठार.
  • १९५८: मराठवाडा विद्यापिठाचा प्रारंभ.
  • १९७५: लाओसमध्ये उठावात साम्यवादी पक्षाने सत्ता काबीज केली.
  • १९८९: एस्टोनिया, लात्व्हिया आणि लिथुएनियातील सुमारे वीस लाख लोकांनी व्हिल्नियस-तालिन रस्त्यावर मानवी साखळी निर्माण केली.
  • १९८९: ऑस्ट्रेलियातील १,६४५ वैमानिकांनी सामूहिक राजीनामा दिला.
  • १९९०: आर्मेनियाने सोवियेत संघापासून स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
  • १९९४: पहिल्या महायुद्धातील एकमेव श्यामवर्णीय वैमानिक युजीन बुलार्ड याला मृत्युपश्चात सेकंड लेफ्टनंटचे पद देण्यात आले.
  • २०००: गल्फ एर फ्लाइट ७२ हे विमान इराणच्या अखातात मनामाजवळ कोसळले. १४३ ठार.

जन्म/वाढदिवस


  • १७५४: लुई सोळावा, फ्रांसचा राजा.
  • १८५२: क्लिमाको काल्देरॉन, कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८६४: एलेफ्थेरियोस व्हेनिझेलोस, ग्रीसचा पंतप्रधान.
  • १९०९: सिड बुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९१७: टेक्स विल्यम्स, अमेरिकन गायक.
  • १९२१: सॅम कूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३१: हॅमिल्टन ओ. स्मिथ, अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ.
  • १९३२: हूआरी बूमेदियेन, अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९५१: अखमद कादिरोव, चेच्न्याचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९५१: नूर, जॉर्डनची राणी.
  • १९६३: रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६७: रिचर्ड पेट्री, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७३: केरी वॉल्म्सली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७३: मलाइका अरोरा खान, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • ६३४: अबु बकर, अरब खलीफा.
  • ११७६: रोकुजो, जपानी सम्राट.
  • १३०५: विल्यम वॉलेस, स्कॉटलंडचा क्रांतिकारी.
  • १३८७: ओलाफ चौथा, नॉर्वेचा राजा.
  • १८०६: चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८९२: देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १९७१: मूळ शामू, सीवर्ल्डमधील ओर्का देवमासा.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play