Download MarathiMati.com's New Android App from Google Play

२० ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० ऑगस्ट २०१४

नरेंद्र दाभोलकर | Narendra Dabholkar

नरेंद्र अच्युत दाभोलकर - (१ नोव्हेंबर १९४५ - २० ऑगस्ट २०१३) हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • ६३६: यार्मूकची लढाई. खालिद इब्ल अल-वालिदच्या नेतृत्त्वाखाली अरबांनी सिरिया व पॅलेस्टाइन जिंकले.
  • १०००: सेंट स्टीवनने हंगेरीचे राष्ट्र स्थापन केले.
  • १७७५: स्पेनने तुसॉन, अ‍ॅरिझोना येथे किल्ला बांधून शहर स्थापले.
  • १७९४: अमेरिकेच्या सैन्याने शॉनी, मिंगो, डेलावेर, व्यांडोट, मायामी, ऑटावा, चिप्पेवा आणि पोटावाटोमी जमातींचा पराभव केला.
  • १८६६: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्रु जॉन्सनने अमेरिकन यादवी युद्ध अधिकृतरित्या संपल्याचे जाहीर केले.
  • १८८२: पीटर इलिच त्चैकोव्सकीचे १८१२ ओव्हर्चर हे संगीत पहिल्यांदा मॉस्कोमध्ये वाजवले गेले.
  • १८८५: इंडियन नॅशनल कॉंग्रेसची स्थापना.
  • १९००: जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.
  • १९१४: पहिले महायुद्ध - जर्मनीने ब्रसेल्स काबीज केले.
  • १९२०: नॅशनल फुटबॉल लीगची डेट्रॉइट येथे स्थापना.
  • १९२६: जपान मध्ये निप्पॉन होसो क्योकैची स्थापना.
  • १९४४: दुसरे महायुद्ध - रोमेनियाची लढाई सुरू.
  • १९५३: सोवियेत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.
  • १९५५: मोरोक्कोमध्ये ऍटलास पर्वतातून आलेल्या बर्बर सैनिकांनी ७७ फ्रेंच नागरिकांना ठार केले.
  • १९६०: सेनेगालने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
  • १९६८: २ लाख सैनिक व ५,००० रणगाड्यांसह सोवियेत संघ व इतर राष्ट्रांनी चेकोस्लोव्हेकियावर चढाई केली.
  • १९७५: व्हायकिंग १चे प्रक्षेपण.
  • १९७७: व्हॉयेजर १चे प्रक्षेपण.
  • १९८६: एडमंड, ओक्लाहोमा येथे पोस्टाच्या कर्मचारी पॅट्रिक शेरिलने आपल्या १४ सहकर्मचार्‍यांची हत्या करून स्वतःला मारुन घेतले.
  • १९८८: इराण-इराक युद्ध - आठ वर्षे चाललेल्या लढायांनंतर युद्धबंदी कायम.
  • १९९१: एस्टोनियाने स्वतःला सोवियेत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.
  • १९९७: सूहाने हत्याकांड - अल्जिरियामध्ये ६० व्यक्ती ठार. १५ अधिक व्यक्तींचे अपहरण.
  • १९९८: ऑगस्ट ७ रोजी केन्या व टांझानियातील आपल्या वकीलातींवर झालेल्या हल्याचा वचपा म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानमधील अल कायदाच्या इमारतींवर क्रुझ प्रक्षेपणास्त्रांनी हल्ला केला. याच वेळी सुदानमध्येही हल्ला करण्यात आला.
  • २००८: स्पानएर फ्लाइट ५०२२ हे माद्रिद पासून ग्रान केनेरियाला निघालेले विमान माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरुन घसरले. १५३ ठार. १८ बचावले.
  • २००८: भारताचा खेळाडू सुशीलकुमार याला बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत कुस्ती या प्रकारात ब्रॉंझ पदक मिळाले.

जन्म/वाढदिवस


  • १७७९: जोन्स जेकब बर्झेलियस, स्विस रसायनशास्त्रज्ञ.
  • १८३३: बेंजामिन हॅरिसन, अमेरिकेचा २३वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९०१: साल्वातोरे क्वासिमोदो, नोबेल पारितोषिक विजेता इटालियन लेखक.
  • १९३७: प्रतिभा रानडे, कथा - कादंबरीकार.
  • १९४१: स्लोबोदान मिलोसेविच, सर्बिया आणि युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४४: राजीव गांधी, भारतीय पंतप्रधान.
  • १९४६: एन.आर. नारायण मुर्ती, भारतीय उद्योगपती.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १९८४: पॉल डिरॅक, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९८४: जादुगार रघुवीर, पुण्याची व महाराष्ट्राची किर्ती जगभर पसरवणारे प्रसिद्ध जादुगार.
  • १९९७: प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.
  • १९९१: गोपीनाथ मोहांती, उडिया लेखक.
  • २००१: फ्रेड हॉयल, ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ.
  • २०१३: नरेंद्र दाभोलकर, बुद्धिवादी, सामाजिक कार्यकर्ते, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष.
  • २०१३: ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर, कालनिर्णय दिनदर्शिकेचे सर्वेसर्वा.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play