२ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ ऑगस्ट २०१३

प्रफुल्लचंद्र रे | Prafulla Chandra Ray

प्रफुल्लचंद्र रे - डॉक्टर प्रफुल्लचंद्र राय / प्रफुल्लचंद्र रे (२ ऑगस्ट १८६१ - १६ जून १९४४) हे बंगाली रसायनशास्त्रज्ञ, उद्योजक शिक्षक होते. ‘बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ या भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापली.

जागतिक दिवस


  • वायु सेना दिन: रशिया.

ठळक घटना/घडामोडी


  • १७९०: अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू.
  • १८६९: जपानमधील वर्णसंस्थेचा शेवट.
  • १९१६: पहिले महायुद्ध - इटलीची लिओनार्डो दा व्हिन्ची ही युद्धनौका बुडाली.
  • १९३४: ऍडोल्फ हिटलर जर्मनीच्या फ्युररपदी.
  • १९४५: दुसरे महायुद्ध - पॉट्ट्सडॅम संमेलनाची सांगता.
  • १९८०: इटलीतील बोलोन्या शहराच्या रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट. ८५ ठार, २०० जखमी.
  • १९८५: डेल्टा एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३७ ठार.
  • १९९०: इराकने कुवैतवर आक्रमण केले.
  • २००५: एर फ्रांस फ्लाइट ३५८ हे एरबस ए.३०० प्रकारचे विमान कॅनडातील टोरोंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरुन घसरले. विमान नष्ट परंतु सर्व प्रवासी बचावले.

जन्म/वाढदिवस


  • १६९६: महमूद पहिला, ओट्टोमन सम्राट.
  • १८६१: प्रफुल्लचंद्र रे, बंगाली रसायनशास्त्रज्ञ
  • १८६८: कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीसचा राजा.
  • १९२८: माल्कम हिल्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३२: पीटर ओटूल, आयरिश अभिनेता.
  • १९५८: अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७६: मोहम्मद झहीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • ६८६: पोप जॉन पाचवा.
  • ११००: विल्यम दुसरा, इंग्लंडचा राजा.
  • १५८९: तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.
  • १६११: केटो कियोमासा, जपानी सामुराई.
  • १९२३: वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष.