१९ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ ऑगस्ट २०१४

सुधा मूर्ती | Sudha Murthy

सुधा कुळकर्णी-मूर्ती - (१९ ऑगस्ट १९५०) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत. इन्फोसिस फाउन्डेशन या एक सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

जागतिक दिवस


 • जागतिक छायाचित्र दिन

ठळक घटना/घडामोडी


 • १६६६: दुसरे अँग्लो-डच युद्ध-होम्सची होळी - रियर अॅडमिरल रॉबर्ट होम्सने नेदरलँड्सच्या टेर्शेलिंग बेटावर हल्ला चढवून १५० व्यापारी जहाजे जाळली.
 • १६९२: सेलम विच ट्रायल्स - चेटूकविद्येचा वापर करीत असल्याच्या आरोपावरून सेलम, मॅसेच्युसेट्स येथे एक स्त्री एक धर्मगुरू सहित पाच व्यक्तींना मृत्युदंड.
 • १८३९: जाक दग्वेरेने आपल्या फ्रेंच विज्ञान अकादमीला छायाचित्र तयार करून दाखवले.
 • १९१९: अफगाणिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९३४: जर्मन जनतेने ८९.९% मतांनी फ्युह्रर हे पद निर्माण करण्याचे ठरवले.
 • १९४४: दुसरे महायुद्ध - दोस्त सैन्याच्या साथीने पॅरिसमधील जनता जर्मनीविरुद्ध उलटली.
 • १९४५: हो चि मिन्ह व्हियेतनाममध्ये सत्तेवर.
 • १९५३: सी.आय.ए.ने इराणमध्ये मोहम्मद मोसादेघचे सरकार उलथवून शाह मोहम्मद रझा पहलवीला सत्तेवर बसवले.
 • १९५५: हरिकेन डायेनने अमेरिकेच्या ईशान्य भागात २०० बळी घेतले.
 • १९८०: सौदी अरेबियातील रियाध शहराच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौदिया फ्लाइट १६३ हे लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार प्रकारचे विमानचे आपत्कालीन परिस्थीतीत उतरले. नंतर लागलेल्या आगीत ३०१ ठार.
 • १९८१: अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी सिद्राच्या अखातात लिब्याची दोन सुखॉई एस.यु. २२ प्रकारची विमाने पाडली.
 • १९८७: युनायटेड किंग्डमच्या हंगरफोर्ड शहरात मायकेल रायनने सोळा व्यक्तींना गोळ्या घालून नंतर स्वतःचा जीव घेतला.
 • १९९१: सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुट्टीवर असताना नजरकैदेत घातले गेले.
 • २००२: ग्रॉझ्नीजवळ चेच्न्याच्या सैन्याने रशियाचे एम.आय. २६ प्रकारचे हेलिकॉप्टर पाडले. ११८ सैनिक ठार.
 • २००३: इराकमधील संयुक्त राष्ट्रांच्या दूतावासावर आत्मघातकी हल्ला. राजदूत सर्जियो व्हियैरा डि मेलोसह २२ ठार.
 • २००३: जेरुसलेममध्ये हमासने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात ७ मुलांसह २३ ठार.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १४: ऑगस्टस सीझर, रोमन सम्राट.
 • १४९३: फ्रेडरिक तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
 • १६६२: ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी.
 • १९०७: हजारी प्रसाद द्विवेदी, ज्येष्ठ एतिहासकार.
 • १९४७: ऍल्सिदे दि गॅस्पेरी, इटलीचा पंतप्रधान.
 • १९४७: मास्टर विनायक, ख्यातनाम मराठी अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते.
 • १९७६: केन वॉड्सवर्थ, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७७: ग्राउचो मार्क्स, अमेरिकन अभिनेता.
 • १९९३: उत्पल दत्त, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते.