१८ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ ऑगस्ट २०१३

नेताजी सुभाषचंद्र बोस | Netaji Subhas Chandra Bose

सुभाषचंद्र बोस - (२३ जानेवारी १८९७ - १८ ऑगस्ट १९४५) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला ‘जय हिंद’ चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १२०१: रिगा शहराची स्थापना.
 • १५८७: रोआनोक वसाहतीच्या गव्हर्नर जॉन व्हाइटची मुलगी व्हर्जिनिया डेर ही अमेरिकेत जन्माला आलेली सर्वप्रथम इंग्लिश व्यक्ती ठरली.
 • १९०९: टोक्योच्या महापौर युकिओ ओझाकीने वॉशिंग्टन डी.सी. शहरास २,००० चेरीच्या झाडांची भेट दिली. अद्यापही ही झाडे पोटोमॅक नदीकाठी आहेत.
 • १९१७: थेसालोनिकी, ग्रीसला आग लागू शहराचा तिसरा भाग भस्मसात.
 • १९२०: अमेरिकेच्या संविधानातील १९वा बदल लागू झाल्याने स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
 • १९४१: नागरिकांच्या दबावापुढे झुकून ऍडॉल्फ हिटलरने मतिमंद व्यक्तींचे शिरकाण तात्पुरते थांबवले.
 • १९६३: जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
 • १९७१: व्हियेतनाम युद्ध - ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलँडने आपले सैनिक व्हियेतनाममधून काढून घेण्याचे ठरवले.
 • १९८३: हरिकेन ऍलिशिया टेक्सासच्या किनार्‍यावर आले. २२ ठार, १ अब्ज अमेरिकन डॉलरचे नुकसान.
 • २००५: जावामध्ये वीज गेल्यामुळे १० कोटी लोक अंधारात.
 • २००८: पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने राजीनामा दिला.

जन्म/वाढदिवस


 • १६९२: लुई हेन्री, डुक दि बर्बन, फ्रांसचा पंतप्रधान.
 • १६९९: थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.
 • १७५०: आंतोन्यो साल्येरी, इटालियन संगीतकार.
 • १७७४: मेरीवेदर लुईस, अमेरिकन शोधक व साहसिक.
 • १७९२: जॉन रसेल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १८३०: फ्रांझ जोसेफ पहिला, ऑस्ट्रियाचा सम्राट.
 • १८७२: विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.
 • १९६२: फेलिपे काल्डेरॉन, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९६७: दलेर मेहंदी, भारतीय गायक, नर्तक.
 • १९८०: प्रीती झंगियानी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १२२७: चंगीझ खान, मंगोल सम्राट.
 • १२७६: पोप एड्रियन पाचवा.
 • १५०३: पोप अलेक्झांडर सहावा.
 • १५५९: पोप पॉल चौथा.
 • १६२०: वान्ली, चिनी सम्राट.
 • १७६५: फ्रांसिस पहिला, पवित्र रोमन सम्राट.
 • १८५०: ऑनोरे दि बाल्झाक, फ्रेंच लेखक.
 • १९४०: वॉल्टर पी. क्रायस्लर, अमेरिकन उद्योगपती.
 • १९४५: नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी.
 • १९९८: पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री.
 • २००८: नारायण धारप, मराठी लेखक.
 • २००९: किम दे-जुंग, दक्षिण कोरियाचा १५वा राष्ट्राध्यक्ष.
 • २००९: रॉबर्ट नोव्हाक, अमेरिकन पत्रकार.