MarathiMati.com - Android App on Google Play Store

१६ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ ऑगस्ट २०१३

१६ ऑगस्ट दिनविशेष(August 16 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

रामकृष्ण परमहंस

रामकृष्ण परमहंस - (बंगाली : রামকৃষ্ণ পরমহংস) (पूर्वाश्रमीचे नाव गदाधर चट्टोपाध्याय) (फेब्रुवारी १८,१८३६ - ऑगस्ट १६,१८८६) हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वराचे अवतार मानले जातात.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना, घडामोडी


 • १७७७ : अमेरिकन क्रांती-बेनिंगटनची लढाई - अमेरिकन सैन्याचा ब्रिटीश सैन्यावर विजय.
 • १७८० : अमेरिकन क्रांती-कॅम्डेनची लढाई - ब्रिटीश सैन्याचा अमेरिकन सैन्यावर विजय.
 • १८१२ : १८१२चे युद्ध : अमेरिकन सेनापती विल्यम हलने फोर्ट डेट्रोईट हा किल्ला न लढताच ब्रिटीश सैन्याच्या हवाली केला.
 • १८६५ : डॉमिनिकन प्रजासत्ताकला परत स्वातंत्र्य.
 • १८९६ : अलास्कातील क्लॉन्डाइक नदीच्या उपनदीत सोने सापडले. क्लॉन्डाइक गोल्ड रश सुरू.
 • १९६० : जोसेफ किटीन्जरने ३१,३३० मीटर (१,०२,८०० फूट) उंचीवरुन उडी मारली व विश्वविक्रम स्थापला.
 • १९६४ : व्हियेतनाम युद्ध - दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरल न्विन खान्हने दुऑँग व्हान मिन्हला पदच्युत केले.
 • १९८७ : नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.
 • २००५ : वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाइट ७०८ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान व्हेनेझुएलातील माचिकेस विमानतळावर उतरताना कोसळले. १६० ठार.

जन्म, वाढदिवस


 • १९१३ : मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
 • १९४४ : मुफसिर उल-हक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९५० : जेफ थॉमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९५२ : महेस गूणतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९५७ : रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


 • १०२७ : जॉर्जि पहिला, जॉर्जियाचा राजा.
 • १४१९ : वेनेक्लॉस, बोहेमियाचा राजा.
 • १४४३ : आशिकागा योशिकात्सु, जपानी शोगन.
 • १७०५ : जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.
 • १८८६ : श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी.
 • १९२१ : पीटर पहिला, सर्बियाचा राजा.
 • १९७७ : एल्विस प्रेसली, अमेरिकन गायक, अभिनेता.
 • १९७९ : जॉन डीफेनबेकर, कॅनडाचा तेरावा पंतप्रधान.
 • २००२ : अबु निदाल, पॅलेस्टाईनचा नेता.
 • २००३ : ईदी अमीन, युगांडाचा हुकुमशहा.
MarathiMati.com - Android App on Google Play Store