MarathiMati.com - Android App on Google Play Store

१४ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑगस्ट २०१३

१४ ऑगस्ट दिनविशेष(August 14 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

१४ ऑगस्ट दिनविशेष | August 14 in History

खाशाबा जाधव - (जानेवारी १५, इ.स. १९२६ - ऑगस्ट १४, इ.स. १९८४) हे ऑलिंपिकपदकविजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.

जागतिक दिवस


  • स्वातंत्र्य दिन : पाकिस्तान.
  • ध्वज दिन : पेराग्वे.

ठळक घटना, घडामोडी


  • १०४० : मॅकबेथने स्कॉटलंडचा राजा डंकन पहिल्याची हत्या केली. शेक्सपियरने लिहिलेल्या मॅकबेथ नाटकातील प्रमुख पात्र यावर आधारित आहे.
  • १८४० : दुसरे सेमिनोल युद्ध - अमेरिकेतील सेमिनोल जमातीचा पराभव व फ्लोरिडातून ओक्लाहोमा येथे सक्तीचे स्थलांतर.
  • १८४८ : ओरेगॉनला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
  • १९१२ : अमेरिकेच्या सैन्याने निकाराग्वावर आक्रमण केले.
  • १९२१ : तन्नु तुव्हा या राष्ट्राची रचना.
  • १९४५ : जपानने दोस्त राष्ट्रांची शरणागतीची कलमे मान्य केली.
  • १९४७ : पाकिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९७१ : बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९७२ : पूर्व जर्मनीचे आय.एल. ६२ प्रकारचे विमान पूर्व बर्लिनच्या विमानतळावर कोसळले. १५६ ठार.
  • १९८० : लेक वालेंसाने ग्डान्स्क जहाजबांधणी केंद्रातील संप पुकारला.
  • १९९४ : इलिच रामिरेझ सांचेझ तथा कार्लोस द जॅकल पकडला गेला.
  • २००५ : हेलियोस एरवेझ फ्लाइट ५२२ हे बोईंग ७३७ प्रकारचे विमान अथेन्स जवळ कोसळले. १२१ ठार.
  • २००६ : इस्रायेल व लेबेनॉनमध्ये युद्धबंदी लागू.

जन्म, वाढदिवस


  • १२९७ : हानाझोनो, जपानी सम्राट.
  • १६८८ : फ्रेडरिक विल्यम पहिला, रशियाचा राजा.
  • १७४० : पोप पायस सातवा.
  • १७७१ : सर वॉल्टर स्कॉट, इंग्लिश ऐतिहासिक कादंबरीकार.
  • १७७७ : फ्रांसिस पहिला, सिसिलीचा राजा.
  • १८७६ : अलेक्झांडर ओब्रेनोविच, सर्बियाचा राजा.
  • १८९३ : ऑस्कार चार्ल्स स्कॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १८९५ : जॅक ग्रेगरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९०९ : लेन डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९११ : वेदतिरी महारिषी, भारतीय तत्त्वज्ञानी.
  • १९२५ : जयवंत दळवी, मराठी लेखक, नाटककार.
  • १९६२ : रमीझ राजा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९६६ : सईद आझाद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९६८ : प्रवीण आम्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७१ : प्रमोद विक्रमसिंगे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ५८२ : तिबेरियस दुसरा कॉन्स्टन्टाईन, बायझेन्टाईन सम्राट.
  • १४३३ : होआव पहिला, पोर्तुगालचा राजा.
  • १४६४ : पोप पायस दुसरा.
  • १९३८ : ह्यू ट्रंबल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९८४ : खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर.
  • १९८८ : आंझो फेरारी, इटालियन कार उत्पादक.
  • २००४ : चेस्लॉ मिलॉझ, नोबेल पारितोषिक विजेता पोलिश लेखक.
  • २००६ : ब्रुनो कर्बी, अमेरिकन अभिनेता.
MarathiMati.com - Android App on Google Play Store