१३ ऑगस्ट दिनविशेष
प्रल्हाद केशव अत्रे - (१३ ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९) आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. फार काय, आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते.
जागतिक दिवस
- -
ठळक घटना/घडामोडी
- १९४२: न्युर्यॉकमध्ये बांबी या चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन. वॉल्ट डिस्नेच्या या अजरामर निर्मितीचा पहिला खेळ रेडियो सिटी म्युझिक हॉलमध्ये झाला.
- १९४३: रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी. डी. देशमुंखांची नियुक्ती.
- १९४५: दुसरे महायुध्द समाप्त.
- १९९१: ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि आधुनिक भारतीय साहित्य क्षेत्रातील एक उत्तूंग व्यक्तिमत्व प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
- २००२: के. के. बिर्ला या उद्योगपतीस कांचीपूरम येथे विद्यासेवारत्न सन्मान प्रदान केला गेला.
- २००४: नागपूरमध्ये संतापलेल्या स्त्रियांनी अक्कू यादव या गुंडाला न्यायालयाच्या आवारात घेरुन ठार मारले.
जन्म/वाढदिवस
- १८९०: बालकवी / त्र्यंबक बापूजी ठोंबरे, मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी.
- १८९८: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते.
- १९०६: विश्राम बेडेकर, लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- १७९५: अहिल्यादेवी होळकर.
- १९१०: फ्लॉरेन्स नाईटिंगेल, जगातील आद्यपरिचारिका.
- १९८८: गजानन जहागीरदार, मराठीतील श्रेष्ठ अभिनेते.