८ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ ऑगस्ट २०१३

१० ऑगस्ट दिनविशेष(August 8 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

दादा कोंडके - कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (१० ऑगस्ट, इ.स. १९३२ ; नायगांव, मुंबई - १४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वयर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली.

जागतिक दिवस


 • स्वातंत्र्य दिन : इक्वेडोर.

ठळक घटना, घडामोडी


 • १५१९ - फर्डिनांड मॅगेलन पाच जहाजे घेउन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाला.
 • १६८० - न्यू मेक्सिकोत पेब्लो क्रांती सुरू.
 • १७९२ - फ्रेंच क्रांती - राजा लुई सोळाव्याला अटक.
 • १८०९ - इक्वेडोरची राजधानी क्विटोने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
 • १८२१ - मिसुरी अमेरिकेचे २४वे राज्य झाले.
 • १८४६ - जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन इंस्टीट्युटची स्थापना.
 • १९१३ - दुसरे बाल्कन युद्ध-बुखारेस्टचा तह - युद्धाचा अंत.
 • १९२० - पहिले महायुद्ध-सेव्ह्रेसचा तह - दोस्त राष्ट्रांनी ऑट्टोमन साम्राज्य आपसांत वाटुन घेतले.
 • १९८८ - दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले.
 • १९९० - मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहावर पोचले.
 • २००६ - युनायटेड किंग्डमची गुप्त पोलिस संस्था स्कॉटलंड यार्डने इंग्लंडहून अमेरिकेला जाणारी विमाने नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळुन लावला.

जन्म, वाढदिवस


 • १२६७ - जेम्स दुसरा, अरागॉनचा राजा.
 • १३९७ - आल्बर्ट दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
 • १८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ.
 • १८७४ - हर्बर्ट हूवर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८९५ - हॅमी लव्ह, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९२३ - फ्रेड रिजवे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९४३ - शफाकत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९५८ - जॅक रिचर्ड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९७० - ब्रेंडन ज्युलियन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९७८ - क्रिस रीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९७९ - दिनुशा फर्नान्डो, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


 • १७५९ - फर्डिनांड सहावा, स्पेनचा राजा.
 • १९४५ - रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.
 • १९७६ - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९८० - याह्या खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
 • २००० - गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.