MarathiMati.com - Android App on Google Play Store

१ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ ऑगस्ट २०१३

१ ऑगस्ट दिनविशेष(August 1 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

तुकाराम भाऊराव साठे - ऊर्फ अण्णा भाऊ साठे (ऑगस्ट १, इ.स. १९२० - जुलै १८, इ.स. १९६९) हे मराठी लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले.

जागतिक दिवस


  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी : भारत.
  • सैन्य दिन : अँगोला, चीन, लेबेनॉन.
  • मुक्ती दिन : त्रिनिदाद व टोबेगो, बार्बेडोस.
  • राष्ट्र दिन : बेनिन, स्वित्झर्लंड.
  • मातृ-पितृ दिन : कॉँगो.
  • उत्सव दिन : निकाराग्वा.

ठळक घटना, घडामोडी


  • ५२७ : जस्टीनियन पहिला बायझेन्टाईन सम्राटपदी.
  • १२९१ : स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना.
  • १४६१ : एडवर्ड चौथा इंग्लंडच्या राजेपदी.
  • १४९२ : ज्यू व्यक्तींची स्पेनमधून हकालपट्टी.
  • १४९८ : क्रिस्टोफर कोलंबसने व्हेनेझुएलात पाउल ठेवले.
  • १६९१ : अमेरिकेत पहिले आफ्रिकन गुलाम आणले गेले.
  • १६६४ : सेंट गॉट्टहार्डची लढाई - ऑट्टोमन साम्राज्याचा पराभव.
  • १७७४ : जोसेफ प्रीस्टली व कार्ल विल्हेमने ऑक्सिजन मूलतत्त्वाचा शोध लावला.
  • १८०० : ग्रेट ब्रिटन व आयर्लंडच्या राज्यांचे युनायटेड किंग्डममध्ये विलीनीकरण.
  • १८३१ : लंडन ब्रिज वाहतुकीस खुला.
  • १८३४ : ब्रिटीश साम्राज्याने गुलामगिरीस बंदी असल्याचे जाहीर केले.
  • १८३८ : त्रिनिदाद व टोबेगोतील गुलामांना मुक्ती.
  • १८७६ : कॉलोराडो अमेरिकेचे ३८वे राज्य झाले.
  • १८९४ : पहिल्या चीन-जपान युद्धास सुरुवात.
  • १९०२ : अमेरिकेने फ्रांसकडून पनामा कालवा बांधून वापरण्याचे हक्क विकत घेतले.
  • १९१४ : पहिले महायुद्ध - जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९२७ : चीनी गृहयुद्ध - नान्चांगचा उठाव.
  • १९३६ : बर्लिनमध्ये १९३६ उन्हाळी ऑलिंपिक सुरू.
  • १९४४ : ऍन फ्रँकने आपल्या रोजनिशीत शेवटची नोंद केली.
  • १९४४ : पोलंडची राजधानी वॉर्सोमध्ये नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव.
  • १९५७ : अमेरिका व कॅनडाने उत्तर अमेरिकी हवाई संरक्षण कमांड (नोरॅड)ची रचना केली.
  • १९६० : बेनिनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६६ : अमेरिकेच्या ऑस्टिन, टेक्सास शहरातील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, ऑस्टिनच्या मुख्य इमारतीतून चार्ल्स व्हिटमनने १५ लोकांना गोळ्या घालून ठार मारले. पोलिसांनी व्हिटमनलाही ठार केले.
  • १९६७ : इस्रायेलने पूर्व जेरुसलेम बळकावले.
  • १९६८ : हसनल बोल्कियाहला ब्रुनेइच्या राजगादीवर राज्याभिषेक.
  • १९९६ : मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.
  • २००४ : पेराग्वेची राजधानी ऍसन्शनमधील सुपरमार्केटमध्ये आग. २१५ ठार, ३०० जखमी.

जन्म, वाढदिवस


  • १० : क्लॉडियस, रोमन सम्राट.
  • १२६ : पर्टिनॅक्स, रोमन सम्राट.
  • १३१३ : कोगोन, जपानी सम्राट.
  • १३७७ : गो-कोमात्सु, जपानी सम्राट.
  • १८५६ : जॉर्ज कुल्टहार्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८५७ : जॉन हॅरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८६१ : सॅमी जोन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९०० : ओट्टो नथ्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९१० : मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९२० : अण्णाभाऊ साठे, मराठी लेखक व समाजसुधारक.
  • १९२४ : फ्रँक वॉरेल, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
  • १९३५ : जॉफ पुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९५२ : झोरान डिंडिक, सर्बियाचा पंतप्रधान.
  • १९५२ : यजुर्वेन्द्रसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९५५ : अरूणलाल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६१ : मायकेल वॅटकिन्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६९ : ग्रॅहाम थोर्प, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७२ : मसूद राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ३७१ : संत युसेबियस.
  • ११३७ : लुई सहावा, फ्रांसचा राजा.
  • १७१४ : ऍन, इंग्लंडची राणी.
  • १९२० : बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक.
  • १९२९ : सिड ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९९९ : निरद चौधरी, इंग्लिश लेखक.
  • २००५ : फह्द, सौदी अरेबियाचा राजा.
MarathiMati.com - Android App on Google Play Store