९ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ एप्रिल २०१८
९ एप्रिल दिनविशेष | April 9 in History
जया बच्चन. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

जया बच्चन - (९ एप्रिल १९४८) जया बच्चन या हिंदी चित्रपटातील एक अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत.जया बच्चन यांना त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटातील नायिका म्हणून ओळखले जाते. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.१९९२ मध्ये श्रीमती जया बच्चन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १८६७: अलास्का खरेदी - एका मताने मंजूरी मिळवून अमेरिकेने रशियाशी करार करून अलास्का विकत घेतले.
 • १९४०: दुसरे महायुद्ध - जर्मनीचे डेन्मार्क आणि नॉर्वे वर आक्रमण
 • १९५३: वॉर्नर बंधूंचा पहिला त्रिमितीय चित्रपट, हाऊस ऑफ वॅक्स, प्रदर्शित झाला.
 • २००५: प्रिन्स चार्ल्सचा कॅमिला पार्कर-बोल्सशी विवाह संपन्न.

जन्म/वाढदिवस


 • १३३६: तैमूरलंग, मोंगोल सरदार.
 • १७७०: थॉमस योहान सीबेक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १७७३: एटियें ऐन्याँ, फ्रेंच लेखक.
 • १८०६: इझाम्बार्ड किंग्डम ब्रुनेल, ब्रिटिश अभियंता.
 • १८२१: चार्ल्स बॉदेलेर, फ्रेंच कवी.
 • १८३५: लिओपोल्ड दुसरा, बेल्जियमचा राजा.
 • १८६५: एरिक लुडेन्डॉर्फ, जर्मन सेनापती.
 • १८६७: ख्रिस वॉटसन, ऑस्ट्रेलियाचा तिसरा पंतप्रधान.
 • १८७२: लेऑन ब्लुम, फ्रांसचा पंतप्रधान.
 • १९३०: एफ. आल्बर्ट कॉटन, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
 • १९४८: जया बच्चन, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • -