७ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ एप्रिल २०१८
७ एप्रिल दिनविशेष | April 7 in History
पंडित रविशंकर. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

पंडित रविशंकर - (७ एप्रिल १९२० - ११ डिसेंबर २०१२) हे एक भारतीय संगीतज्ञ होते. हे इसवी सनाच्या विसाव्या शतकातील सतारवादनातील एक श्रेष्ठतम वादक मानले जातात. अभिजात भारतीय संगीतातील मैहर घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अलाउद्दीन खान यांचे ते शिष्य होते.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १८२७: जॉन वॉकर या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ्याने आपली पहिली घर्षण काडेपेटी विकली. त्याने आदल्या वर्षी हिचा शोध लावला होता.
 • १९४८: जागतिक आरोग्य संघटेनेची स्थापना.
 • १९६४: आय.बी.एम. तर्फे सिस्टम/३६० ची घोषणा.

जन्म/वाढदिवस


 • १६५२: पोप क्लेमेंट बारावा.
 • १७७०: विल्यम वर्ड्सवर्थ, इंग्लिश कवी.
 • १८६०: विल कीथ केलॉग, अमेरिकन उद्योगपती.
 • १९२०: पंडित रविशंकर, भारतीय संगीतकार.
 • १९३९: फ्रांसिस फोर्ड कॉप्पोला, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
 • १९४२: जीतेंद्र, हिंदी चित्रपट अभिनेता.
 • १९४४: गेर्हार्ड श्रोडर, जर्मनीचा चान्सेलर.
 • १९५४: जॅकी चान, हाँग काँगचा चित्रपट अभिनेता.
 • १९६४: रसेल क्रोव, न्यू झीलँडचा चित्रपट अभिनेता.
 • १९८२: सोंजय दत्त, भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १८०३: तुसाँ ल'ओव्हर्चर, हैतीचा क्रांतिकारी.