२६ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ एप्रिल २०१८
२६ एप्रिल दिनविशेष | April 26 in History
रमाबाई रानडे. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

रमाबाई रानडे - (२५ जानेवारी १८६२ - २६ एप्रिल १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या.

जागतिक दिवस


  • एकत्रीकरण दिन: टांझानिया.

ठळक घटना/घडामोडी


  • १४७८: इटलीतील पाझींनी फ्लोरेन्समध्ये चर्चमधील रविवारच्या सामूहिक प्रार्थने दरम्यान लॉरेन्झो दि मेदिची वर हल्ला केला. लॉरेन्झोचा भाउ ज्युलियानी मृत्युमुखी पडला.
  • १६०७: इंग्लंडचे काही वसाहती केप हेन्री, व्हर्जिनिया येथे पोचले. यांनी पुढे जेम्सटाउन शहर वसवले.
  • १८०२: नेपोलियन बोनापार्टने फ्रेंच क्रांतीत देशाबाहेर पळून गेलेल्या जहागिरदारांना माफी जाहीर केली व परत फ्रांसमध्ये बोलावले.
  • १८६५: अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या जनरल जोसेफ जॉन्स्टनने उत्तरेच्या विल्यम टेकुमेश शर्मन समोर उत्तर कॅरोलिनातील ड्युरॅम येथे शरणागती पत्करली.
  • १८६५: अब्राहम लिंकनची हत्या करून पळालेल्या जॉन विल्कस बूथला सैनिकांनी ठार केले.
  • १९२४: रमाबाई रानडे यांचे निधन.
  • १९२५: पॉल फोन हिंडेनबर्ग वायमार प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९३३: जर्मनीची गुप्त पोलिस यंत्रणा गेस्टापोची रचना.
  • १९३७: जर्मनीच्या लुफ्तवाफेने स्पेनच्या गर्निका शहरावर बॉम्बफेक केली. याचे परिणाम पाहून ख्यातनाम चित्रकार पाब्लो पिकासोने गर्निका हे जगप्रसिद्ध चित्र काढले.
  • १९४२: मांचुरियाच्या हॉन्केइको कोलियरी या कोळशाच्या खाणीत स्फोट. १,५४९ कामगार ठार. आत्तापर्यंतचा खाणीत झालेला हा सगळ्यात मोठा अपघात आहे.
  • १९६२: नासाचे रेंजर ४ हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.
  • १९६४: टांगानिका व झांझिबार देश एकत्र आले. टांझानियाची रचना.
  • १९७०: सुवेझ कालवा भागामध्ये पुन्हा एकदा चकमकी सुरू झाल्या. इजिप्त व इस्त्रायल यांचे हवाई हल्ले सुरू झाले. एकमेकांविरुद्धचे शत्रुत्व आणि विभागीय सत्ता संतुलन, हक्क यासाठी सशस्त्र संघर्ष सुरू
  • १९८६: युक्रेनमध्ये चर्नोबिल अणु भट्टीत अपघात. घातक किरणोत्सर्गाने युरोप, एशियातील अनेक देश प्रभावित.
  • १९९४: चायना एरलाइन्सचे एरबस ए-३००जातीचे विमान जपानच्या नागोया विमानतळावर कोसळले. २६४ ठार.
  • २००२: जर्मनीच्या एरफर्ट शहरात रॉबर्ट स्टाइनहाउझरने आपल्या शाळेतील १३ शिक्षक, २ विद्यार्थी व १ पोलिस अधिकार्‍याला ठार मारले.
  • २००५: २९ वर्षांनी सिरियाची लेबेनॉनमधून माघार.

जन्म/वाढदिवस


  • १२१: मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट.
  • १६४८: पेद्रो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
  • १८९४: रुडॉल्फ हेस, नाझी अधिकारी.
  • १९००: चार्ल्स रिश्टर, अमेरिकन भूशास्त्रज्ञ.
  • १९०८: सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
  • १९१७: आय.एम. पै, अमेरिकन स्थापत्यविशारद.
  • १९६३: जेट ली, चीनी अभिनेता.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • ११९२: गो-शिराकावा, जपानी सम्राट.
  • १४८९: अशिकागा योशिहिसा, जपानी शोगन.
  • १९२०: श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ.
  • १९२४: रमाबाई रानडे, मराठी लेखिका आणि समाजसुधारक.