२५ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ एप्रिल २०१३

२५ एप्रिल दिनविशेष(April 25 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

२५ एप्रिल दिनविशेष | April 25 in History

थोरले बाजीराव पेशवे - (ऑगस्ट १८, इ.स. १७०० - एप्रिल २८, इ.स. १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या.

जागतिक दिवस


 • ऍन्झाक दिन : ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड.
 • क्रांती दिन : पोर्तुगाल.
 • फेस्ता देला लिबरेझियोन (स्वातंत्र्य दिन) : इटली.
 • ध्वज दिन : फेरो द्वीपसमूह, स्वाझीलँड.

ठळक घटना/घडामोडी


 • १६०७ : ८० वर्षांचे युद्ध - नेदरलँड्सने जिब्राल्टरजवळ स्पेनचे आरमार बुडवले.
 • १७९२ : क्लॉड जोसेफ रूगे दि लिलने फ्रेंच राष्ट्रगीत ला मार्सेलची रचना केली.
 • १८२९ : चार्ल्स फ्रीमॅन्टल पश्चिम ऑस्ट्रेलियाला पोचला.
 • १८४६ : मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू.
 • १८५९ : प्रसिध्द सुएझ कालव्याच्या बांधकामास सुरुवात.
 • १८६२ : अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेने न्यू ऑर्लिअन्स जिंकले.
 • १८९८ : अमेरिकेने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १९०१ : अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यात स्वयंचलित वाहनांना नंबरप्लेट लावणे सक्तीचे केले.
 • १९१५ : पहिले महायुद्ध - ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडचे सैन्य तुर्कस्तानमध्ये उतरले.
 • १९२६ : ईराणमध्ये रझा शाह पहलवी सत्तेवर.
 • १९४५ : दुसरे महायुद्ध - मिलानमधून नाझींची हकालपट्टी.
 • १९७४ : पोर्तुगालमध्ये जनतेचा उठाव. लोकशाही पुन्हा अमलात.
 • १९८२ : रंगीत दूरदर्शन प्रक्षेपणाला सुरुवात.
 • १९८३ : अंतराळयान पायोनियर १०सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.
 • १९८६ : म्स्वाती तिसरा स्वाझीलँडच्या राजेपदी.
 • २००५ : जपानच्या आमागासाकी शहराजवळ रेल्वे अपघात. १०७ ठार.

जन्म/वाढदिवस


 • ३२ : मार्कस साल्व्हियस ओथो, रोमन सम्राट.
 • १२१४ : लुई नववा, फ्रांसचा राजा.
 • १२२८ : कॉन्राड दुसरा, जर्मनीचा राजा.
 • १२८४ : एडवर्ड दुसरा, इंग्लंडचा राजा.
 • १५४५ : यी सुन शिन, कोरियन दर्यासारंग.
 • १५९९ : ऑलिव्हर क्रॉमवेल, ब्रिटीश राजकारणी, अघोषित राजा.
 • १८७४ : गुग्लियेमो मार्कोनी, इटलीचा संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ, रेडिओ संशोधक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ११८५ : अंतोकु, जपानी सम्राट.
 • १२९५ : सांचो चौथा, कॅस्टिलचा राजा.
 • १६०५ : नरेस्वान, सयामचा राजा.
 • १६४४ : चॉँगझेंग, चीनी सम्राट.
 • १७४० : थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.
 • १८४० : सिमिओन-डेनिस पोइसॉन, फ्रेंच गणितज्ञ.
 • २००५ : स्वामी रंगनाथानंद, भारतीय तत्त्वज्ञानी; अध्यक्ष, रामकृष्ण मिशन.