२४ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ एप्रिल २०१८
२४ एप्रिल दिनविशेष | April 24 in History
सचिन तेंडुलकर. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

सचिन तेंडुलकर - (२४ एप्रिल १९७३) हा क्रिकेटविश्वात सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे.

जागतिक दिवस


 • प्रजासत्ताक दिन: गाम्बिया.
 • वंशहत्त्या स्मृती दिन: आर्मेनिया.
 • काप्यॉँग दिन: ऑस्ट्रेलिया.

ठळक घटना/घडामोडी


 • ११८४: शहराबाहेर आणुन ठेवलेल्या प्रचंड लाकडी घोडा (ट्रोजन हॉर्स) ट्रॉयच्या सैन्याने कुतुहलापायी आत घेतला. घोड्यात लपलेले ग्रीक सैनिक रात्री बाहेर पडले व दहा वर्षे चाललेल्या ट्रॉयचा वेढा संपवला.
 • १८००: लायब्ररी ऑफ कॉँग्रेसची स्थापना.
 • १८६३: कीझव्हिलची कत्तल - कॅलिफोर्नियातील कीझव्हिल येथे ५३ स्थानिक अमेरिकन व्यक्तिंची हत्त्या.
 • १९१५: आर्मेनियन वंशहत्या - कॉन्स्टेन्टिनोपलमध्ये सुरु झालेली आर्मेनियन वंशीय व्यक्तिंचे हत्याकांड नंतर ओट्टोमन साम्राज्यभर पसरले.
 • १९५५: बांडुंगची सभा समाप्त. २९ देशांच्या या सभेत पंचशील तत्त्वांचा पुरस्कार केला गेला.
 • १९६७: रशियाचे अंतराळयान सोयुझ १ कोसळले. अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह मृत्युमुखी.
 • १९६८: मॉरिशियसला संयुक्त राष्ट्रांचे सभासदत्त्व.
 • १९७०: चीनचा पहिला मानवनिर्मित उपग्रह डॉँग फँग हॉँग १चे प्रक्षेपण.
 • १९७०: गाम्बिया प्रजासत्ताक झाले.
 • १९७५: स्टॉकहोममध्ये बाडर-माइनहॉफ टोळीने पश्चिम जर्मनीची वकीलात उडवली.
 • १९८०: ईराणमध्ये ओलिस असलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना सोडवण्याच्या निष्फळ प्रयासात ८ अमेरिकन सैनिक ठार.
 • १९८१: आय. बी. एम. ने सर्वप्रथम वैयक्तिक संगणक प्रदर्शित केला.
 • १९९०: हबल दुर्बीणीचे प्रक्षेपण.
 • १९९३: आय. आर. ए. ने लंडनच्या बिशप्सगेट भागात बॉम्बस्फोट घडवला.
 • २००४: अमेरिकेने लिब्यावर १८ वर्षांपूर्वी घातलेले आर्थिक निर्बंध दूर केले.
 • २००५: कार्डिनल जोसेफ रॅट्झिंगर पोप बेनेडिक्ट सोळावा या नावाने पोप पदी.
 • २००६: नेपाळचा राजा ग्यानेंद्रने ४ वर्षांपूर्वी बरखास्त केलेली संसदीला पुनः मान्यता दिली.
 • २००७: नॉर्वेने युद्ध सुरू नसताना आइसलँडचे रक्षण करण्याचे कबूल केले.
 • २०१३: बांगलादेशची राजधानी ढाकाच्या उपनगरातील इमारत कोसळून १,१२७ व्यक्ती ठार. २,५००पेक्षा अधिक जखमी.

जन्म/वाढदिवस


 • १८८९: सर स्टॅफर्ड क्रिप्स, ब्रिटीश राजकारणी; क्रिप्स मिशनचा नेता.
 • १८९७: मनुएल अव्हिला कामाचो, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२६: थॉर्ब्यॉम फाल्डिन, स्वीडनचा पंतप्रधान.
 • १९७३: सचिन तेंडुलकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १८५२: व्हासिली झुकोव्स्की, रशियन कवी.
 • २००५: एझेर वाइझमन, इस्रायेलचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९४२: दीनानाथ मंगेशकर, गायक.
 • २०११: सत्य साईबाबा.