१९ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ एप्रिल २०१८
१९ एप्रिल दिनविशेष | April 19 in History
आर्यभट्ट कृत्रिम उपग्रह. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

आर्यभट्ट कृत्रिम उपग्रह - (१९ एप्रिल १९७५) भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह ‘आर्यभट्ट’ याचे सन १९७५ मध्ये सोव्हियत रशिया कडून प्रक्षेपण केले गेले.‘आर्यभट्ट्’ हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह आहे. थोर भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आले आहे.

जागतिक दिवस


  प्रजासत्ताक दिन: सियेरा लिओन.

ठळक घटना/घडामोडी


 • १५८७: सर फ्रांसिस ड्रेकने केडिझच्या बंदरात स्पेनच्या आरमाराचा पराभव केला.
 • १७७५: अमेरिकन क्रांती - कॉँकॉर्ड व लेक्झिंग्टनची लढाई.
 • १८१०: व्हेनेझुएलाने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
 • १८३९: १८३९चा लंडनचा तह - बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात.
 • १९०४: कॅनडातील टोरोंटो शहर आगीत भस्मसात.
 • १९०९: जोन ऑफ आर्कला संत घोषित करण्यात आले.
 • १९१९: अमेरिकेच्या लेस्ली अर्विनने सर्वप्रथम पॅराशुटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली.
 • १९३६: पॅलेस्टाईनमध्ये उठाव.
 • १९४८: बर्मा संयुक्त राष्ट्रात समाविष्ट.
 • १९६०: दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्‍ही विरुद्ध विद्यार्थ्यांची निदर्शने.
 • १९६१: पिग्सच्या अखातातील आक्रमण - घुसखोरांचा पराभव.
 • १९७१: सियेरा लिओन प्रजासत्ताक झाले. सियाका स्टीवन्स राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९७१: रशियाने सर्वप्रथम मानवनिर्मित अंतराळस्थानक सॅल्युत १चे प्रक्षेपण केले.
 • १९७५: आर्यभट्ट या प्रथम भारतीय उपग्रहाचे रशिया मधिल कापुस्टीन यार अवकाश केंद्रावरुन यशस्वी प्रक्षेपण.
 • १९७८: लागुमॉट हॅरिस नौरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९८९: यु.एस.एस. आयोवा या अमेरिकेच्या युद्धनौकेवर स्फोट. ४७ ठार.
 • १९९३: वेको, टेक्सास येथे ब्रांच डेव्हिडीयनच्या इमारतीस आग. ८१ ठार.
 • १९९५: ओक्लाहोमा सिटी येथे आल्फ्रेड पी. मरा फेडरल बिल्डींग मध्ये अमेरिकन अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवला. १६८ ठार.
 • १९९९: जर्मनीची संसद परत बर्लिन येथे.
 • २०००: एर फिलिपाईन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान दाव्हाओ आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३१ ठार.
 • २००५: जोसेफ रॅट्झिंगर पोप बेनेडिक्ट सोळावा या नावाने पोपपदी.

जन्म/वाढदिवस


 • १३२०: पेद्रो पहिला, पोर्तुगालचा राजा.
 • १४५२: फर्डिनांड दुसरा, अरागोनचा राजा.
 • १७९३: फर्डिनांड पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
 • १८८२: गेतुइलो व्हार्गास, ब्राझिलचा पंतप्रधान.
 • १८९७: पीटर दी नरोन्हा, भारतीय उद्योगपती.
 • १९०३: इलियट नेस, अमेरिकन पोलिस.
 • १९३३: डिकी बर्ड, इंग्लिश क्रिकेटपंच.
 • १९३६: विल्फ्रीड मार्टेन्स, बेल्जियमचा पंतप्रधान.
 • १९३७: जोसेफ एस्ट्राडा, फिलिपाईन्सचा अभिनेता व राष्ट्राध्यक्ष.
 • १९६८: म्स्वाती तिसरा, स्वाझीलँडचा राजा.
 • १९७५: जेसन गिलेस्पी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९८७: मारिया शारापोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १०५४: पोप लिओ नववा.
 • १३९०: रॉबर्ट तिसरा, स्कॉटलंडचा राजा.
 • १५७८: उएसुगी केन्शिन, जपानी सामुराई.
 • १६८९: क्रिस्टीना, स्वीडनची राणी.
 • १८८१: बेंजामिन डिझरायेली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १९०६: पिएर क्युरी, फ्रेंच संशोधक, नोबेल पुरस्कार विजेता.
 • १९६७: कॉन्राड अडेनॉउअर, जर्मनीचा चान्सेलर.
 • १९७४: अयुब खान, पाकिस्तानचा पंतप्रधान.