१४ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २०१८
१४ एप्रिल दिनविशेष | April 14 in History
डॉ. बाबासाहेब आंबेडकर. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - (१४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६) हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, भारताचे प्रथम कायदा व न्यायमंत्री, बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते आणि भारतीय गणराज्याचे जनक होते.

जागतिक दिवस


 • आंबेडकर जयंती: भारत व जगभरात.
 • ज्ञान दिन: महाराष्ट्र राज्य.
 • मुंबई अग्निशमन सेवा दिन.

ठळक घटना/घडामोडी


 • ४३:फोरम गॅलोरमची लढाई - ज्युलियस सीझरचा मारेकरी डेसिमस ज्युनियस ब्रुटस मार्क ऍन्टनीच्या सैनिकांकडून ठार.
 • १८२८:नोआह वेब्स्टरने डिक्शनरीचा कॉपीराईट नोंदवला.
 • १८६०:पोनी एक्सप्रेसचा पहिला घोडेस्वार साक्रामेंटो, कॅलिफोर्निया येथे पोचला.
 • १८६५:जॉन विल्कस बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. लिंकन दुसर्‍या दिवशी मृत्यू पावला.
 • १९१२:आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. बोटीला भगदाड पडून बुडु लागली.
 • १९१५:तुर्कस्तानने आर्मेनियावर आक्रमण केले.
 • १९३१:स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने राजा आल्फोन्सो तेराव्याची हकालपट्टी केली व दुसरे स्पॅनिश प्रजासत्ताक अस्तित्त्वात आल्याचे जाहीर केले.
 • १९४०:युनायटेड किंग्डमचे सैनिक नॉर्वेतील नाम्सोस गावात शिरले व गाव काबीज केले.
 • १९४४:मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या बोटीवर महाभयानक विस्फोट. ३०० ठार. त्याकाळच्या २ कोटी पाउंडचे नुकसान.
 • १९६२:जॉर्जेस पॉम्पिदु फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
 • १९८६:अमेरिकेच्या लढाउ विमानांनी लिब्याच्या बेंगाझी व ट्रिपोली शहरांवर हल्ला केला. ६० ठार.
 • १९८६:बांगलादेशमध्ये १ किलो वजनाच्या अतिप्रचंड गारांचा वर्षाव. ९२ ठार. गारांच्या वजनाचा हा विक्रम अजुन अबाधित आहे.

जन्म/वाढदिवस


 • १३३६:गो-कोगोन, जपानी सम्राट.
 • १५७८:फिलिप तिसरा, स्पेनचा राजा.
 • १७४१:मोमोझोनो, जपानी सम्राट.
 • १८६६:ऍन सुलिव्हान, हेलन केलरची शिक्षिका.
 • १८९१:डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानचे शिल्पकार, मानवी हक्काचे कैवारी, अद्वितीय विद्वान
 • १९२५:एबेल मुझोरेवा, झिम्बाब्वेचा पंतप्रधान.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १५९९:हेन्री वॅलप, इंग्लिश राजकारणी.
 • १७५९:जॉर्ज फ्रीडरीक हान्डेल, जर्मन संगीतकार.
 • १९५०:श्री रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञ.
 • १९६२:सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.