१३ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ एप्रिल २०१८
१३ एप्रिल दिनविशेष | April 13 in History
जलियांवाला बाग हत्याकांड. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

जलियांवाला बाग हत्याकांड - (१३ एप्रिल १९१९) या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १०५५:व्हिक्टर दुसरा पोपपदी.
 • ११११:हेन्री पाचवा, पवित्र रोमन सम्राटपदी.
 • १२०४:चौथ्या क्रुसेडने कॉन्स्टेन्टिनोपल लुटले.
 • १२५०:सातव्या क्रुसेडचा ईजिप्तमध्ये पराभव.
 • फ्रांसचा राजा लुई नववा युद्धबंदी.
 • १८२९:ब्रिटीश संसदेने रोमन कॅथोलिक व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य दिले.
 • १८४९:हंगेरी प्रजासत्ताक झाले.
 • १८६१:अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट सम्टरचा पाडाव केला.
 • १९१९:जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती.
 • १९३९:भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.
 • १९४१:जपान व सोवियेत संघाने तटस्थतेचा तह केला.
 • १९४५:जर्मनीच्या गार्डेलजेन शहरात १,०००हून अधिक राजबंदी व युद्धबंद्यांची हत्या.
 • १९७०:अपोलो १३मधील ऑक्सिजन टँकचा स्फोट. आतील अंतराळवीर यानासह भरकटण्याची भीती.
 • १९७४:व्यापारी तत्त्वावर चालणारा पहिला भूस्थिर उपग्रह वेस्टार १ प्रक्षेपित.
 • २००२:व्हेनेझुएलात ह्युगो चावेझ विरुद्धचा उठाव फसला.

जन्म/वाढदिवस


 • १७१३:लॉर्ड फ्रेडरिक नॉर्थ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १७४३:थॉमस जेफरसन, अमेरिकेचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
 • १८६६:बुच कॅसिडी, अमेरिकन लुटारू.
 • १८९४:आर्थर फॅडेन, ऑस्ट्रेलियाचा तेरावा पंतप्रधान.
 • १९१३:दत्ताजी ताम्हाणे, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत.
 • १९२२:ज्युलियस न्यरेरे, टांझानियाचा पंतप्रधान.
 • १९६३:गॅरी कास्पारोव्ह, रशियाचा बुद्धिबळपटू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १६०५:बोरिस गोडुनोव्ह, रशियाचा झार.
 • १८६८:ट्युवोड्रोस, इथियोपियाचा सम्राट.
 • १९६६:अब्दुल सलाम आरिफ, इराकचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९७५:फ्रांस्वा टोम्बालबाये, चाडचा राष्ट्राध्यक्ष.
 • २००८:दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.