११ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ एप्रिल २०१८
११ एप्रिल दिनविशेष | April 11 in History
के.एल्. सैगल. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

के.एल्. सैगल - (११ एप्रिल १९०४ - १८ जानेवारी १९४७) हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय बोलपटांतील सर्वात लोकप्रिय गायक अभिनेते होते. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉइस’ म्हणायचे.

जागतिक दिवस


 • हुआन सांतामारिया दिन: कॉस्टा रिका.

ठळक घटना/घडामोडी


 • १२४१: मोंगोल सरदार बाटु खान याने हंगेरीचा राजा बेला चौथा यास मोहीच्या लढाईत पराभूत केले.
 • १८६८: जपानमध्ये शोगन व्यवस्थेचा अंत.
 • १८९९: स्पेनने पोर्तोरिकोचा प्रांत अमेरिकेला दिला.
 • १९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने बुखेनवाल्ड कॉँसेन्ट्रेशन कॅम्प मधून कैद्यांची मुक्तता केली.
 • १९५१: कोरियन युद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने जनरल डग्लस मॅकआर्थरकडून सरसेनापतीपद काढून घेतले.
 • १९६१: बॉब डिलनने आपली गायकीची सुरुवात केली.
 • १९६५: अमेरिकेच्या मध्य भागात ५१ टोर्नेडोंचा उत्पात. २५६ ठार.
 • १९६८: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लिन्डन बी. जॉन्सनने १९६८च्या नागरी हक्क कायद्यावर सही केली. या कायद्यानुसार घराच्या खरेदी, विक्री, ई. व्यवहारात वंशानुसार भेदभाव करणे कायदेबाह्य ठरले.
 • १९७०: अपोलो १३चे प्रक्षेपण.
 • १९७९: युगांडाचा हुकुमशहा ईदी अमीन पदच्युत.
 • १९८१: दक्षिण लंडनच्या ब्रिक्स्टन भागात हिंसा. ६५ नागरिक व ३०० पोलिस जखमी.
 • २००२: ट्युनिसीयात अल कायदाकडून बॉम्बहल्ला. २१ ठार.
 • २००२: व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझविरुद्ध फसलेला उठाव सुरू.

जन्म/वाढदिवस


 • १३५७: होआव पहिला, पोर्तुगालचा राजा.
 • १७५५: जेम्स पार्किन्सन, इंग्लिश डॉक्टर.
 • १८२७: जोतीबा फुले, भारतीय विचारवंत, समाजसुधारक.
 • १९०४: के.एल्. सैगल, हिंदी भाषा पार्श्वगायक.
 • १९५३: गाय व्हेरोफ्श्टाट, बेल्जियमचा पंतप्रधान.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १०३४: रोमानस तिसरा, बायझेन्टाईन सम्राट.
 • १६१२: इमॅन्युएल फान मेटरेन, फ्लेमिश इतिहासकार.
 • १९६७: डोनाल्ड सँगस्टर, जमैकाचा पंतप्रधान.