रूद्राक्ष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ ऑगस्ट २०११

रूद्राक्ष | Rudraksha

रूद्राक्ष - [Rudraksha] रुद्राक्षाचे १२ प्रकार आणि त्यांचे आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक महत्त्व.

रूद्राक्ष असे नाव उच्चारताच भगवान शंकराचे चित्र डोळ्यासमोर येते. हजारो वर्ष तप केल्यानंतर जेव्हा शंकराच्नी डोळे उघडले. आणि त्या डोळ्यांतून जे अश्रू पृथ्वीवर पडले. त्यापासून रूद्राक्षाची उत्पत्ती झाली.

रूद्राक्ष धारण केल्याने अनेक प्रकारच्या रोगापासून मुक्ती मिळते. एकमुखी रूद्राक्ष सहज उपलब्ध होते. रूद्राक्षमाळा घातल्याने एक नवसंजीवनी प्राप्त होते. उच्च रक्तदाब व हृदय रोगांपासून मुक्ती मिळवता येते. ग्रहबाधा, भूतप्रेत बाधा शारीरिक पीडा कमी होते. ज्याच्या पत्रिकेत कालसर्प योग असेल त्यांनी रूद्राक्ष अवश्य धारण करावा.

रूद्राक्षाच्या माळेवर ‘ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप केल्यास खुप फायदा होतो. रूद्राक्ष सोमवारी धारन करावा. पूजा, श्रद्धा आणि विश्वास पूर्ण रूद्राक्ष धारण केल्यास चाळीस दिवसातच त्याची अनुभूती व कार्यसिद्धी होते.

रूद्राक्षाचे प्रकार

एक मुखी रूद्राक्ष:
अतिदुर्मिळ व मूल्यवान असा गोल व काजूच्या आकारासारखा असतो. हा रूद्राक्ष साक्षात भगवान शिव स्वरूप आहे. त्यापासून भक्ती आणि मुक्ती दोघांची प्राप्ती होते.

दोन मुखी रूद्राक्ष:
हा शिवपार्वतीचे रूप मानले जाते. अर्थात अर्धनारीनटेश्वर रूप. हा वैभव देणारा आहे.

त्रिमुखी रूद्राक्ष:
हा ब्रम्ह,विष्णू, महेश स्वरूप त्रिमुर्ती रूप आहे. हा रूद्राक्ष भूत, भविष्य आणि वर्तमान या गोष्टीचे ज्ञान प्राप्त करून देतो.

चारमुखी रूद्राक्ष:
हा ब्रम्हदेवाचे स्वरूप मानला गेलेला आहे. धर्म, अर्थ, काम मोक्ष, प्राप्त होते.

पाचमुखी रूद्राक्ष:
हा भगवान शंकराचे पंचानन रूपाचे स्वरूप आहे. हा रूद्राक्ष कामना पूर्ण व मोक्ष प्राप्ती देतो.

सहामुखी रूद्राक्ष:
या रूद्राक्षाला भगवान शंकराचे पूज्य कार्तिक स्वामीचे स्वरूप मानले गेले आहे. हा रूद्राक्ष धारण केल्यानंतर सुप्त शक्ती जागृत होते.

सातमुखी रूद्राक्ष:
या रूद्राक्षाला धारण केल्यावर आरोग्य, यश, किर्ती, प्रतिष्ठा प्राप्त होते. संसारात वैभव व समृद्धी मिळते.

अष्ठमुखी रूद्राक्ष:
कोर्ट कचेरी विजयी होण्यासाठी विघ्न, बाधा मुक्ती देतो.

नऊमुखी रूद्राक्ष:
हा रूद्राक्ष देवी मातेचे स्वरूप मानला जातो. पापापासून मुक्ती आणि देवीमातेची कृपा होते.

दहामुखी रूद्राक्ष:
भगवान विष्णूंचे दहा अवतार दहामुखी रूद्राक्षात वास करतात.

अकरामुखी रूद्राक्ष:
हा सुख समृद्धीची वृद्धी करतो. सर्वांना प्राप्त करण्यासाठी व किर्ती मिळविण्यासाठी धारण करतात.

बारामुखी रूद्राक्ष:
हा भगवान सुर्यनारायणाचा खुप आवडीचा आहे. अग्निमय दारिद्रता, मनुष्य हत्या, चोरीचे पाप नाहीसे होतात.