NashikDiary.com
MarathiMati.com - Android App on Google Play Store
MarathiMati.com - Android App on Google Play Store

राशिहून बाळाची[मुलांची व मुलींची] नावे

Marathi baby Names as per Rashi

मुलांची । मुलींची मराठी नावे | Marathi Boys and Girls Names with Meanings

ज्योतिषशास्त्रीय नामकरण प्रथा ज्योतिषशास्त्रदृष्ट्या नामकरणाची प्रथा फार प्राचीन काळापासून आजतागायत चालत आलेली आहे.

या पध्दतीप्रमाणे बाळाचा जन्म झाल्यावर जन्मकुंडली तयार करुन घेतली जाते व त्या बाळाच्या जन्माच्यावेळी ज्या राशीत चंद्र असेल त्या चंद्रराशीप्रमाणे व त्यावेळी जे जन्मनक्षत्र असेल त्याचे जे कारण असेल त्या प्रमाणे नाव ठेवले जाते.

एकुण २७ नक्षत्रे आहेत. चंद्र प्रत्येक राशीत सव्वा दोन दिवस असतो. म्हणजे चंद्राचा बारा राशीतून भ्रमणाचा काळ २७ दिवस आहे. म्हणजेच एका राशीत सव्वादोन नक्षत्रे असतात. नक्षत्रांची आद्याक्षरे पाहून नावे ठेवणे सोईचे होईल.

मेष राशिहून बाळाची नावे

मेष ही बारा राशींपैकी पहिली रास होय, मेष राशीधारी व्यक्तींच नाव चू,चे,चो,ला,ली,लू,ले,लो,अ,आ,अं,ळ,ल या अक्षरांवरुन येते.

वृषभ राशिहून बाळाची नावे

वृषभ ही बारा राशींपैकी दुसरी रास होय, वृषभ राशीधारी व्यक्तीचं नाव ई,ऊ,ए,आ,वा,वी,वू,वे,वो,व,ब या अक्षरांवरुन येत.

मिथुन राशिहून बाळाची नावे

मिथुन ही बारा राशींपैकी तीसरी रास होय, मिथुन राशीधारी व्यक्तीचं नाव का,की,कू,घ,ड,च,के,को,ह,क या अक्षरांवरुन येते.

कर्क राशिहून बाळाची नावे

कर्क ही बारा राशींपैकी चौथी रास होय, कर्क राशीधारी व्यक्तीचं नाव ही,हू,हे,हो,डा,डी,डू,डे,डो,ड या अक्षरांवरुन येत.

सिंह राशिहून बाळाची नावे

सिंह ही बारा राशींपैकी पाचवी रास होय, सिंह राशीधारी व्यक्तींच नाव मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे,म या अक्षरांवरुन येते.

कन्या राशिहून बाळाची नावे

कन्या ही बारा राशींपैकी सहावी रास होय, कन्या राशीधारी व्यक्तीचं नाव टो,पा,पी,मु,मू,ष,ग,ड,पे,पी,ज या अक्षरांवरुन येत.

तुळ राशिहून बाळाची नावे

तुळ ही बारा राशींपैकी सातवी रास होय, तुळ राशीधारी व्यक्तींच नाव र,रा,री,रु,रे,रो,ता,ती,तू,ते या अक्षरांवरुन येते.

वृश्चिक राशिहून बाळाची नावे

वृश्चिक ही बारा राशींपैकी आठवी रास होय, वृश्चिक राशीधारी व्यक्तीचं नाव तो,ना,नो,नू,नी,य,या,यि,यु,य या अक्षरांवरुन येत.

धनु राशिहून बाळाची नावे

धनु ही बारा राशींपैकी नववी रास होय, धनु राशीधारी व्यक्तींच नाव ये,यो,भ,भा,भी,भू,धा,फा,ढा,भे,ध या अक्षरांवरुन येते.

मकर राशिहून बाळाची नावे

मकर ही बारा राशींपैकी दहावी रास होय, मकर राशीधारी व्यक्तीचं नाव भो,जा,जी,खी,खे,खू,खो,गा,गी,ज,ख या अक्षरांवरुन येत.

कुंभ राशिहून बाळाची नावे

कुंभ ही बारा राशींपैकी अकरावी रास होय, कुंभ राशीधारी व्यक्तींच नाव गु,गे,गो,सा,सी,सू,से,सो,द,दा,स,श्र या अक्षरांवरुन येते.

मीन राशिहून बाळाची नावे

मीन ही बारा राशींपैकी बारावी रास होय, मीन राशीधारी व्यक्तीचं नाव दी,दू,भ,दे,दै,दो,चं,चा,चि,झ,थ या अक्षरांवरुन येत.


MarathiMati.com - Android App on Google Play Store