मेष राशीच्या मुलांची व मुलींची नावे
Aries Boys and Girls Names
मेष | Aries
बारा राशींपैकी पहिली
मेष राशीधारी व्यक्तींच नाव पुढील अक्षरांवरुन येते - चू,चे,चो,ला,ली,लू,ले,लो,अ,आ,अं,ळ,ल.
राशी स्वामी
मंगळ
शरीरयष्टी
मध्यम बांधा, सडपातळ शरीर, लांब पाय, गळा मोठा.
व्यक्ति (स्वभाव) विशेष
अत्यंत हट्टी, पण दृढनिश्चयी. काम करण्याची चिकाटी भरपूर, तद्वतच गाढा आत्मविश्वास. जबर आत्मविश्वास असूनही कधी कधी ते आपला विचार बदलतात. काटकसरी, कार्यकुशल, पण मत्सरी, भित्रे व चंचल. रागीट. आत्मकेंद्री. सश्रध्द. ख्याती कशी प्राप्त होईल ह्या विचारात सदैव गढलेले आणि ती प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे.
राशीचा रंग
लाल.





