Download MarathiMati.com's New Android App from Google Play

भूमी परिक्षण

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ ऑगस्ट २०११

भूमी परिक्षण | Bhumi Parikshan

वास्तु निर्मिती करण्यासाठी योग्य जागा निवडण्यासाठी काही भूमी परिक्षण करण्याच्य सोप्या पद्धती.

 • पद्धत क्र. १ : एक फूट रुंदी व एक फूट लांबी व एक फूट खोली असलेला खड्डा प्लॉटमध्ये खोदावा. त्या नंतर खोदून काढलेली माती पुन्हा त्या खड्ड्यात भरावी खड्डा भरून माती उरल्यास ती भूमी चांगली जाणावी.
 • पद्धत क्र. २ : वरील प्रमाणे खड्डा करून त्यात पूर्ण पाणी भरणे व खड्ड्यापासून १०० पाऊले चालत जाऊन परत येणे. या वेळात शिल्लक पाणी ३/४ कमी झाल्यास ती भूमी अयोग्य जाणावी. पाणी निम्म्यापेक्षा जास्त राहिल्यास उत्तम भूमी जाणावी.
 • पद्धत क्र. ३ : वरील प्रमाणे सूर्यास्तास खड्डा पाण्याने पूर्ण भरणे आणि सूर्यादयाला परिक्षण करणे. जर पणी निम्म्यापेक्ष जास्त शिल्लक असेल तर जमिन उत्तम. जर पाणी आटून पूर्ण तळाला भेगा पडाल्या असतील, तर ती भूमी अत्यंत वाईट जाणावी.
 • पद्धत क्र. ४ : वरील प्रमाणे खड्ड्यात पाणी भरणे जर पाणी प्रदक्षिणा मार्गाने फिरत असेल तर चांगले, उलट फिरत असल्यास अशुभ परिणाम जाणावेत.
 • पद्धत क्र. ५ : प्लॉटच्या काही भागात ची पेरून त्याचे अपेक्षित कालात मोड आल्यास उत्तम न आल्यास अशुभ

प्लॉटची जमीन : ज्या जमिनीवर वनस्पती झाडे उगवतात. ती जमिन सजीव भूमी समजली जाते. अशी जमिन वास्तुसाठी शुभ असते. ज्या जमिनीत वनस्पती, हिरवे गवत उगवत नाही, जिथे किंचीत ओलावा नाही, जी जमिन खारी आहे, ज्या जमिनीत काटेरी वनस्पती उगवतात किंवा जी जमिन खडताळ, रेताड असेल अशा भूमिला मृत भूमी समजतात. अशी भूमी वास्तू निवासासाठी अयोग्य असते. या जागेत रहिवाश्याची प्रगती होणे अशक्य असते. त्याचप्रमाणे मन स्वास्थ्य लाभत नाही.

जमिनीचा रंग व परिणाम :

 • पांढरी माती : ज्ञान, शिक्षण यासाठी योग्य.
 • तांबडी माती : अधिकारी व शासकीय नोकरास योग्य.
 • पिवळी माती : व्यवसायासाठी चांगली
 • काळी माती : शारीरिक श्रम करण्यासाठी चांगली

घरबांधण्यास मुहुर्त :

वैशाख, श्रवण, मार्गशीर्ष, पौश या महिन्यात घर बांधले असता पुत्रपौत्रादी सौख्य व द्रव्यलाभ होईल. बाकीचे महिने विशेष फलप्रद नाहीत.

घर बांधण्यास वार :

सोमवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार हे शुभ आहेत. रविवार व मंगळवार वर्ज आहेत. शनिवार साधारण आहे.

घर बांधण्यास शुभतिथी :

शुक्ल व कृष्ण पक्षातील १/४/८/९/१४/३० या तिथी अशुभ आहेत बाकीच्या शुभ आहेत.

पाया राखण्यास मुहुर्त :

भरणी, कृतिका, आश्लेषा, मघा, पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, विशाखा व मुळ नक्षत्रावर शुक्रवारी इतर कुठलेही वाईट योग नसताना घराचा पाया खणावा.

विवाहास ग्रहांचे बळ :

मुलासाठी रविबल, वधुसाठी गुरूबल, व दोघांसाठी चंद्रबल असणे गरजेचे आहे.
 • रविचे बल : जन्मराशी पासून ०, ३, ६, १०, ११ या स्थानी रवि असता रविबल आहे, असे समजावे.
 • गुरूबल : जन्मराशी पासून २, ५, ७, ११ वा गुरू असल्यास, गुरूबल आहे असे समजावे. १, ३, ६, १० या स्थानी गुरू साधारण असतो. ४, ८, १२ असल्यास अनिष्टसमजावा. लग्नकार्य करायचे असेल तर गुरूची शांती जप करावा.
 • चंद्रबल : जन्मराशी पासून २, ५, ७, ११ या स्थानी गोचरीचा चंद्र असल्यास शुभ असतो. ४, ८, १२ स्थानी असल्यास अनिष्ट व बाकीचा साधारण.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play