माझा बालमित्र | Majha Balmitra

वर्गातली झोप

- तन्वी पटेल

ईयत्ता ९वी, रोजरी स्कुल (वारजे, पुणे)

Marathi Kavita by Tanvi Patel, Rojari School Warje Pune

मधली सुट्टी संपली

आनंदाचा काळ गेला

कशी गेली ती चांगली सकाळ

ईतिहासाचा तास आला

आदीमानव आणि त्याचे खेळ

फार कंटाळवाण्या त्याच्या वागणी

किती सावकाश जातोय वेळ

झोप इतरांसारखी मला आली

बाकावरती पुस्तक

फळ्यासमोर बाई

हातात माझे पुस्तक

तास संपायची फार घाई

घड्याळ मात्र खुप वेडं

पटपट चालतच नाही

उलगडतच नाही कोडं

हाच तास इतका मोठा का बाई?

हाच विचार मनी असता

हळूच डोळे मिटले

बाईंना फसवता-फसवता

स्वप्नांच्या दूनीयेत हरवून गेले

मग कसा हा तास संपला

काही समजलेच नाही

अचानक तो जोरात आवाज आला

वर्गाबाहेर गेल्या बाई

शेवटी मला आली जाग

आले फिरून परत वर्गात

या दु:खी मनाची करायला आग

भूगोलाचे सर आले आत..

Marathi Kavita by Tanvi Patel, Rojari School Warje Pune

MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer