Download MarathiMati.com's New Android App from Google Play

शेळी, करडू आणि लांडगा

लेखन: अनंत दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जुलै २००६

गरुड आणि घुबड | Garud Aani Ghubad

‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’

एक शेळी सकाळी उठून, चरण्यासाठी रानात जाण्यास निघाली, त्यावेळी ती आपल्या करडास म्हणाली, “बाळ, आपल्या खोपटाचे दार आतून लावून घे.’ ‘सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो,’ असे शब्द जो उच्चारील त्यासच आत घे. इतरांस दार उघडू नको.” हे भाषण एका लांडग्याने आडून ऐकले आणि शेळी बाहेर जाताच, खोपटाच्या दारापाशी येऊन तो म्हणाला, ‘सगळ्या लांडग्याचा सत्यानाश होवे.’ शेळीने सांगितलेले शब्द उच्चारताच करडू दार उघडील असे त्यास वाटले होते; पण त्या करडास त्याचा शब्द ऐकून संशय आल्यामुळे, त्याने दार उघडले नाही. ते खिडकीतूनच लांडग्यास म्हणाले, ‘तू जर बोकड आहेस, तर तुला दाढी कशी नाही?’ हा प्रश्न ऐकून लांडगा ओशाळला आणि निमूटपणे चालता झाला.

तात्पर्य - फसवेगिरी करणाऱ्या माणसासंबंधाने शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play