पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

गाढव आणि लांडगा

लेखन: अनंत दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | १० जुलै २००६

गाढव आणि लांडगा | Gaadhav Aani Laandga

गाढव नम्रपणे त्याला म्हणाले, ‘वैदयबुवा! कृपा करून माझ्या पायातला हा काटा आपण काढून दया.’

एकदा एक गाढव रानात भटकत होते. फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोचला. तो काटा काही त्याला काढता येईना. तेवढ्यात तिकडून एक लांडगा येताना त्याला दिसला. गाढव नम्रपणे त्याला म्हणाले, ‘वैदयबुवा! कृपा करून माझ्या पायातला हा काटा आपण काढून दया.’ लांडग्याने ते ऐकले आणि त्याच्या पायातला काटा काढून दिला. परंतु, त्या दुष्ट गाढवाने लगेच एक लाथ लांडग्याच्या तोंडावर मारली आणि कोलमडून पडलेल्या लांडग्याकडे बघत ते मजेने निघून गेले.

तात्पर्य - काही माणसे इतकी कृतघ्न असतात, की ज्याने आपल्याला संकटातून वाचवले त्याच्याशीसुध्दा ते शिष्टपणे वागतात.

Book Home in Konkan