दुर्दैवी जोडपे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ एप्रिल २०१८
दुर्दैवी जोडपे - इसापनीती कथा | Durdaivi Jodape - Isapniti Katha | Isapniti Story
दुर्दैवी जोडपे

दुर्दैवी जोडपे - इसापनीती कथा - [Durdaivi Jodape - Isapniti Katha/Isapniti Story]

एक आळशी मुलगा शाळेस जात असे. त्यास मुळाक्षरापैकी पहिल्या अक्षराचाही उच्चार काही केल्या करता येईना. शेवटी पंतोजी म्हणाला, ‘अरे, तोंड उघडून ‘अ’ म्हण. ’ त्या मुलाने तोंड पसरले, पण ‘अ’ म्हणण्याचा नुसता प्रयत्नही केला नाही! आपल्या प्रयत्नाचा काही उपयोग होणार नाही अशी पंतोजीची खात्री झाल्यावर, मुलांनी आपापसात त्यास समज देण्याचे ठरवले. एकाने म्हटले, ‘अ’ म्हणणे ही इतकी कठीण गोष्ट नाही, असे मला वाटते. आळशी म्हणाला, ‘होय, खरेच ते कठीण नाही! पण मी एकदा ‘अ’ म्हणालो की, माझ्या मागे ‘आ’ म्हण म्हणून टुमणे लागणारच! म्हणून माझा निश्चय आहे की उच्चारच करावयाचा नाही.’

तात्पर्य: जेव्हा आपण सर्वांसच अप्रिय होतो, तेव्हा तो दोष आपल्याच स्वभावाचा असला पाहिजे असे समजून, तो स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.