दोन बेडूक

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ एप्रिल २०१८
दोन बेडूक - इसापनीती कथा | Don Beduk - Isapniti Katha | Isapniti Story
दोन बेडूक

दोन बेडूक - इसापनीती कथा - [Don Beduk - Isapniti Katha/Isapniti Story]

एका मोठया तळ्यात दोन बेडूक रहात असत. एके वर्षी उन्हाळा इतका कडक पडला की, त्यामुळे त्या तळ्यातले सगळे पाणी आटून गेले. मग ते दोघे बेडूक दुसरीकडे कोठे तरी पाणी मिळेल तर पहावे, म्हणून निघाले. जाता जाता त्यास एक मोठी खोल अशी विहीर लागली. तीत पाणी भरपूर होते. ते पाहून, एक बेडूक दुसऱ्यास म्हणतो, ‘गडया, आपणास राहण्यास ही जागा फार चांगली आहे, तर चल आपण खाली उड्या टाकू.’ दुसरा बेडूक शहाणा होता. तो म्हणाला, ‘अरे, तू म्हणतोस ते खरे; पण आपण एकदा या विहीरीत उतरल्यावर त्यातील पाणी आटले, तर पुन्हा आपणास वर कसे येता येईल ?’

तात्पर्य: पूर्ण विचार केल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नये.