दैव आणि मुलगा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २०१८
दैव आणि मुलगा - इसापनीती कथा | Daiv Aani Mulga - Isapniti Katha | Isapniti Story
दैव आणि मुलगा

दैव आणि मुलगा - इसापनीती कथा - [Daiv Aani Mulga - Isapniti Katha/Isapniti Story]

एक मुलगा शेतात खेळता खेळता दमला आणि जवळच एक विहीर होती तिच्या अगदी कडेवर जाऊन निजला. ते पाहून दैवाने त्यास हळूच हलवून जागे केले आणि म्हटले, ‘मुला, मी तुझा जीव वाचविला हे लक्ष्यात ठेव. तू जर आता झोपेत लोळून या विहीरीत पडून मेला असतास तर त्याबद्दल लोकांनी मला दोष दिला असता. पण तूच सांग, ‘हा दोष माझा होता का तुझा होता?’