चिचुंद्री आणि तिची आई

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २०१८
चिचुंद्री आणि तिची आई  | Chichundri Aani Tichi Aai
चिचुंद्री आणि तिची आई

चिचुंद्री आणि तिची आई - इसापनीती कथा - [Chichundri Aani Tichi Aai - Isapniti Katha/Isapniti Story]

एकदा एका चिचुंद्रीच्या पोराने आपल्या नाकात तपकीर घातली, त्यामुळे त्याला त्रास झाला. मग ते आपल्या आईस म्हणाले, ‘आई, माझ्या कानात केवढा भयंकर आवाज होतो आहे! शंभर नगारे एकदम वाजत असल्याचा आवाज मला ऐकू येत आहे आणि माझ्या डोळ्यांपुढे तर एक मोठी भट्टी पेटल्यासारखा प्रकाश दिसत आहे!’ यावर त्याची आई म्हणाली, ‘पोरा किती बडबड लावली आहेस ही? असल्या खोटया गोष्टी सांगून रजाचा गज करण्याची ही खोड बरी नाही.’