बुजणारा घोडा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २०१८
बुजणारा घोडा | Bujanara Ghoda
बुजणारा घोडा

बुजणारा घोडा - इसापनीती कथा - [Bujanara Ghoda - Isapniti Katha/Isapniti Story]

एका घोडयाला आपल्याच छायेला बुजण्याची खोड होती. ही खोड जावी म्हणून त्याच्या स्वाराने पुष्कळ प्रयत्न केले व शेवटी त्यास काटेरी लगामही घालून पाहिला; परंतु ती त्याची खोड जाईना. तेव्हा तो त्या घोडयास म्हणाला, ‘मूर्खा, छाया म्हणजे तुझीच सावली. तुझ्या शरीरांतून उजेड पार जात नाही म्हणून छाया पडते. छायेला दात नाहीत, पंजे नाहीत व तुझ्या चालण्याच्या आडही ती येऊ शकत नाही, तर मग तू तिला भितोस काय म्हणून ?’ घोडयाने उत्तर दिले, ‘धनीसाहेब कोणी मोठा शत्रू झाला तरी त्याला कशा ना कशाची तरी भीती वाटते. तुम्ही मनुष्ये स्वप्नात भितात किंवा अंधारांत एखादया लाकडाच्या ओंडक्याला पाहून घाबरतात ते काय म्हणून? तेथे तरी तुमच्या कल्पनेशिवाय तुम्हांला घाबरविणारे दुसरे कोण असते बरे?’

तात्पर्य: मी हसे लोकाला आणि शेंबुड माझ्या नाकाला.