ब्रह्मदेव आणि पशु

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २०१८
ब्रह्मदेव आणि पशु - इसापनीती कथा | Brahmadev Aani Pashu - Isapniti Katha | Isapniti Story
ब्रह्मदेव आणि पशु

ब्रह्मदेव आणि पशु - इसापनीती कथा - [Brahmadev Aani Pashu - Isapniti Katha/Isapniti Story]

एके वेळी सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाने सर्व पशूंस आपल्यासमक्ष बोलावून म्हटले, “तुमच्या शरीररचनेत काही उणेपणा आहे असे तुम्हांस वाटत असेल तर सांगा म्हणजे त्याप्रमाणे सुधारणा करू.” यावर एक वानर म्हणाला, ‘देवा मी स्वतःच्या रूपावर संतुष्ट आहे, परंतु माझा मित्र जो अस्वल, त्याचा वेडेपणा थोडा कमी झाला तर बरे.’ अस्वल रागावून म्हणाला, ‘माझ्या स्वरूपात तर नाव ठेवण्यास जागा नाही. परंतु आमच्या हत्तीदादांचे कान थोडे लहान केले आणि शेपूट थोडे वाढविले तर बरे होईल.’ हत्ती म्हणाला, ‘उंटाच्या पाठीचे पोक नाहीसे झाले तर बरे.’ असे सर्व पशु एकमेकांबद्दल बोलू लागले तेव्हा ब्रह्मदेवाने त्या सर्वांस आपणासमोरून हाकलून लावले.

तात्पर्य: लोकांच्या डोळ्यातले कुसळही चटकन दिसते. आपल्या डोळ्यांतले मुसळही दिसत नाही.