अतृप्त गाढव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २०१८
अतृप्त गाढव - इसापनीती कथा | Atrupt Gadav - Isapniti Katha | Isapniti Story
अतृप्त गाढव

अतृप्त गाढव - इसापनीती कथा - [Atrupt Gadav - Isapniti Katha/Isapniti Story]

थंडीच्या दिवसात, एक गाढवास असे वाटेल की, उघडी हवा आणि वाळलेला कडवा यांच्या ऐवजी थोडीशी उष्णता आणि घासभर ताजे गवत आपणास मिळेल तर फार चांगले होईल. ही त्याची इच्छा लवकरच पूर्ण झाली परंतु त्याबरोबरच त्याचे कामही वाढले व त्यामुळे त्याला हिवाळ्याप्रमाणेच उन्हाळ्याचाही कंटाळ येऊ लागला. आता पावसाळा येईल तर चांगले, असे त्याला वाटू लागले. लवकरच पावसाळा आला व पुढे येणाऱ्या हिवाळ्यासाठी लागणारे सामान वाहून नेण्याचे श्रम त्याला पडू लागले. शेवटी, आता हिवाळा येईल तर चांगला असे त्याला वाटू लागले !

तात्पर्य: अतृप्त मनुष्याचे समाधान कचितच होते.